Palghar Nargrik

Breaking news

पालघर:- विक्रमगड विधानसभेच आमदार सुनिल चंद्रकांत भुसारा यांनी पालघर राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी करून याभागासाठी २२ टन अन्नधान्य राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट च्या माध्यमातून पाठवण्यात आले आहे*…..

 

राज्याच्या कोकण विभागात नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले गावच्या गावे ओसाड झाली तर अनेक निष्पाप लोकांचे बळीही गेले अनेक संसार उघड्यावर आले अशा वेळी अवघा महाराष्ट्र या लोकांसाठी पूरग्रस्त भागाच्या मदतीसाठी सरसावला आहे अशावेळी आपणही समाजाचे देणे लावतो या भावनेतून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पालघरचे जिल्हाध्यक्ष तथा विक्रमगड विधानसभेच आमदार सुनिल चंद्रकांत भुसारा यांनी पालघर राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी करून याभागासाठी २२ टन अन्नधान्य राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट च्या माध्यमातून पाठवण्यात आले आहे.
याशिवाय अजून एक ट्रक माल आणि जीवनावश्यक वस्तूही पाठवण्यात येणार असून ज्या कोणालाही जीवनावश्यक वस्तुंची मदत करावयाची असेल त्यांनी आमच्याशी संपर्क करावा असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पालघर कडून करण्यात आले आहे.आमदार सुनिल भुसारा यांच्या हिरवे पिंपळपाडा या निवासस्थानावरून या मालवाहतूक ट्रकला राष्ट्रवादीचा झेंडा दाखवुन रवाना करण्यात आले आहे यानंतर आठवडाभरात अन्नधान्याबरोबरच दुसरे साहित्यही पाठवण्यात येणार आहे * यावेळी जिल्हाउपाध्यक्ष प्रमोद कोठेकर मा.बांधकाम व अर्थ समिती सभापती काशिनाथ चौधरी विक्रमगड विधानसभा अध्यक्ष कमळाकर धुम युवक शहराध्यक्ष वैभव पाटील युवा नेते सन्नी पवार तालुकाउपाध्यक्ष रामदास कोरडेराहुल बोराडे ईमरान शेख मनोज पाटील जयवंत भुसारा आदि पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Comment