आपल्या जिल्ह्याची कार्य समिती बैठक महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा सौ.ज्योती ताई भोये यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत केली होती. या बैठकीसाठी प्रमुख अतिथी सन्मानिय जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील साहेब महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा सचिव व महिला मोर्चा जिल्हा प्रभारी सौ. आम्रपाली ताई साळवे तसेच जिल्ह्याचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहिले होते. बैठक दिनांक २८ जुलै रोजी झाली आहे तरी सर्व महिला कार्यकर्त्यांनी दीड वाजता वेळेत उपस्थित राहिले.
त्यावेळी त्यांनी संघटनामक आणि बोध रचना विषयी चर्चा करण्यात आली.महिला प्रदेश पदाधिकारी, महिला जिल्हा प्रभारी, व सहप्रभारी, महिला जिल्हा पदाधिकारी, सर्व जिल्हा प्रकोष्ट अध्यक्षा , महिला आघाडी – सेल अध्यक्ष – सरचिटणीस, महिला मंडळ अध्यक्ष – सरचिटणीस, महिला नगरसेविका, जिल्हा परिषद सदस्य, पं. स सभापती, गटनेता.
तसेच सौ. ज्योती ताई भोये – म. मो. जिल्हा अध्यक्षा*
सौ. रंजना ताई संखे – म.मो. जिल्हा सरचिटणीस
सौ. गीतांजलीताई सावे – म. मो.जिल्हा सरचिटणीस
सौ. मेघनाताई पाटील – म. मो.जिल्हा सरचिटणीस
कु. अर्चना पाटील – म. मो.जिल्हा सरचिटणीस कार्यकर्ते उपस्थित होते