आज पालघर वसई सतीवली UPHC मध्ये पालघर डिस्ट्रिक्ट टास्क फोर्स चे I MA प्रतिनिधी डॉ राजेन्द्र चव्हण व VVMC चे डॉ राजेश चव्हाण आणि इतर डॉक्टर्स नर्सेस व स्टाफ च्या समक्षाने सुरू झाले. व गरोदर महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.. डॉ राजेन्द्र चव्हण बोलले आता सर्व माता या सुविधा चे लाभ घेवू शकणार व माता आणी बाळाला कोविड पासून सुरक्षा भेटणार त्या वेळी अनेक २० स्त्रियांचे परिवार नियोजन शस्त्रक्रिया डॉ्. राजेंद्र चव्हाण यांनी मोफत करून या वर्षाचे सरकारी दवाखान्यात परीवार नियोजन शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन सुद्धा केले.. आता दर महिन्या च्या ठराविक दिवशी अशी शस्त्रक्रिया मोफत करण्याचे हमी सिरानी दिली व जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा हे आव्हान सर्वांना केले.
सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार, ‘कोविड – १९’ या आजाराचा तीव्र संसर्ग होण्याचे प्रमाण इतर महिलांच्या तुलनेने गरोदर महिलांमध्ये अधिक होण्याची शक्यता असते. तसेच ‘कोविड – १९’ बाधित गरोदर महिलांमध्ये गरोदर काळ पूर्ण होण्याआधी प्रसूति होण्याचे प्रमाण अधिक आहे.
कोविड – १९’ बाधित ९०% गरोदर महिलांना दवाखान्यात भरती होण्याची गरज भासत नाही. परंतु सुमारे १०% गरोदर महिलांमध्ये गरोदरपणी मधुमेह, लठ्ठपणा, अधिक काळापासून असलेले श्वसनाचे आजार, प्रतिकार शक्ती विषयक औषधोपचार, डायलेसिस, हृदयरोग यामुळे ‘कोविड – १९’ आजाराचा तीव्र संसर्ग होण्याचे प्रमाण वाढते व अचानक तब्येत ढासळल्यास त्यांना अतिदक्षता विभागात भरती करण्याची आवश्यकताही भासू शकते. तथापि, ‘कोविड – १९’ बाधित ९५% मातांची नवजात बालके सुस्थितीत जन्मतात. तर उर्वरित ५% नवजात बालके प्रसूतीच्या अपेक्षित दिनांकापूर्वी जन्माला येऊ शकतात.
अशा बालकांच्या बाबत त्यांना रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता भासू शकते किंवा क्वचित प्रसंगी नवजात बालकाचा दुर्दैवाने मृत्यू ओढवू शकतो. या बाबींपासून गर्भवती महिलांचा आणि होणा-या बाळाचा बचाव करण्यासाठी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करवून घेणे फायदेशीर ठरु शकते. या सर्व बाबी लक्षात घेऊन केंद्र सरकारने गर्भवती महिलांचे ‘कोविड – १९’ लसीकरण करण्यासंदर्भात निर्देश दिलेले आहेत.
नगरपालिका क्षेत्रातील संबंधीत लसीकरण केंद्रात गर्भवती महिला गर्भधारणेनंतरच्या पूर्ण कालावधींतर्गत सदर लसीचा लाभ घेऊ शकतात.
2. प्रत्येक गरोदर महिलेने या संदर्भात संपूर्ण माहिती घ्यावी व पूर्ण माहितीपश्चात स्वेच्छेने लसीकरण करवून घ्यावे.
3. ज्या महिलांना ‘कोविड – १९’ प्रादुर्भाव होऊन गेलेला असेल व ज्या महिलांना ‘मोनॉक्लोनल ऑंटीबोडीज’ किंवा प्लाजमा हा उपचार घेतलेला असेल, अशा महिलांना १२ आठवड्यानंतर लसीकरण करून घेता येईल.
कोविड – १९’ लसीकरणानंतर, काही लाभार्थ्यांमध्ये सौम्य स्वरुपाचा ताप, इंजेक्शनच्या ठिकाणी दुखणं किंवा १ ते ३ दिवस अस्वस्थ वाटण्याची भावना दिसून येऊ शकते. तुरळक स्वरूपात १ ते ५ लाख लोकांमधील एखादया लाभार्थ्यास लसीकरणानंतर २० दिवसापर्यंत गंभीर लक्षणे आढळून येऊ शकतात.
या अनुषंगाने, गरोदर महिलांना कोविड लसीकरण व याबाबतचे समुपदेशन करण्याबाबत सर्व संबंधीत कर्मचा-यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात आले असून,गर्भवती महिलांसाठी ‘कोविड – १९’ लसीकरण सुरु करण्यात येत आहे.