दोन डोस घेतलेल्यांना लवकरच लोकल प्रवास सुरू होऊ शकतो असे स्पष्ट संकेत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रिफ यांनी दिले आहेत. लोकल प्रवासादरम्यान होणारी गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली जाईल. मंत्रिमंडळातही यावर चर्चा झाली असं मुश्रिफ म्हणाले. लोकल प्रवास लवकरच सुरू होणार असल्याने श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला जातोय असा टोला त्यांनी भाजपला लगावला. आता मंत्रिमंडळातही यावर चर्चा झाल्यानंतर कधी लोकल प्रवास सुरू होतो याकडे सर्वांचं लक्ष आहे.