पालघर::- पोलिस मित्र संघटना पालघर जिल्हा यांच्या वतीने “एक हात मदतीचा,” मानव सेवा हीच खरी ईश्र्वर सेवा, हे ब्रीदवाक्य घेऊन आणि समाजसेवेचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेऊन आपल्या कोकणामध्ये झालेल्या नुकसानग्रस्तांना सढळ हस्ते मदत करण्यासाठी शनिवार दिनांक ०७/०८/२०२१ रोजी सकाळी १०:oo वाजता पालघर डीवायएसपी ऑफिस येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक,पालघर, श्री. पडळकर साहेब यांच्या हस्ते पुरग्रस्तांसाठी घेऊन जाणाऱ्या गाडीला श्रीफळ फोडून रवाना करण्यात आले.या प्रसंगी मोठ्या प्रमाणात पोलीस बांधव उपस्थित होते.
या कार्यक्रमा मागील प्रेरणा ,संस्थापक अध्यक्ष श्री.राजेंद्रजी कपोते साहेब यांची होती.या कार्यक्रमासाठी पालघर जिल्हा कार्यकारिणीचे अध्यक्ष श्री.सुलक्षण पाटील,जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.श्री.राजेश संखे,जिल्हा संपर्क प्रमुख श्री.हर्ष सावे,पालघर तालुका प्रमुख श्री.चिराग पाटील यांनी विशेष मेहनत घेतली.
या कार्यक्रमासाठी अडव्होकेट सौ.संयुक्ता तामोरे मॅडम,सौ.सुवर्णा वाघमारे मॅडम,श्री.तुषार घरत,श्री.अमोल पवार,श्री तवरेज कुरेशी,श्री.तुषार पाटील उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटना ही मागील 35 वर्षांपासून पोलिसांच्या न्याय हक्कांसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी सातत्याने कार्य करत आहे.आत्तापर्यंत आलेल्या विविध आपत्ती मध्ये ही संघटना समस्या ग्रस्तांच्या पाठीमागे भक्कमपणे उभी राहिलेली आहे.