Palghar Nargrik

Breaking news

एकनाथ खडसे बॉम्बे रुग्णालयात दाखल…..

राष्ट्रवादी नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे मागील एका आठवड्यापासून बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. युरीन इन्फेक्शनमुळे मागील एका आठवड्यापासून खडसेंवर उपचार सुरु असल्याची माहिती प्रशासन रूग्णालयाने दिली आहे.

रुम नं. १३५६, तेरावा मजल्यावर खडसेंवर उपचार सुरु असून प्रकृति स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे आणि त्यांचे कुटुंबीय हे सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीमध्ये अडकले आहेत. ‘एमआयडीसी’तील भूखंड खरेदीप्रकरणात नेमण्यात आलेल्या न्या. झोटिंग समितीने आपल्या अहवालात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी स्वतःच्या किंवा पत्नीच्या आणि जावयाच्या फायद्यासाठी पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

भोसरी एमआयडीसीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीचा तपास हा योग्य दिशेने सुरु आहे. गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर आता स्वतः एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही अटक होण्याची शक्यता अ‍ॅडव्होकेट असीम सरोदे यांनी व्यक्त केली होती

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]

Leave a Comment