Palghar Nargrik

Breaking news

श्री सुनील भगवंतराव टोके, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मुंबई पोलीस दल, मुख्य नियंत्रण कक्ष, मुंबई यांनी काढले पाेलिस दलाचे/विभागाचे वाभाडे/गैरप्रकार व व्यकत केली आपली व्यथा/तक्रार !!

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७

माझ्या खाजगी भ्रमणध्वनी यंत्रणेचे कॉल्स डिटेल्स काढण्या पूर्वी विशेष शाखा मुंबई येथील मा.अपर पोलीस आयुक्त श्री रवींद्र शिसवे सद्या मा अपर पोलीस आयुक्त पुणे आणि तत्कालीन कायदा व सुव्यवस्था मा सह पोलीस आयुक्त श्री देवेन भारती सद्या नेमणूक दहशत वाद विभाग यांनी त्यांना प्राप्त असलेल्या पदांचा जाणीवपूर्वक बेकायदेशीर काम करताना दुरुपयोग नक्कीच केलेला आहे.

नमूद वरिष्ठ सनदी अधिकारी यांनी पोलीस दलातील भ्रष्टाचार व अपारदर्शक वार्षिक सर्वसाधारण बदल्या या प्रमुख गोष्टीवर विचार मंथन करून योग्य उपाय योजना अंमलात आणण्याचे काम तर केलेच नाही पण त्यांनी स्वतःचे शासकीय काम ही बेजबाबदार पणाने केले असून पोलीस दलातील भ्रष्टाचार करणाऱ्या सनदी अधिकारी, त्यांचे सहकारी यांना वाचवण्यासाठी हे सर्व मनमानी कारभार करून माझा काटा काढण्याचा प्रयत्न केलेला आहेच.

मा.अपर पोलीस आयुक्त पुणे,श्री रवींद्र शिसवे व दहशत वाद विरोधी विभागाचे श्री देवेन भारती यांना या कामात खुलेआम बेकायदेशीर मदत, सामुग्री तत्कालीन भारतीय जनता पार्टी व शिवसेना युती शासनाच्या माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या शासनाने नक्कीच केलेली आहे हे सर्व जनतेला व मुंबई पोलीस दलातील त्या त्या काळाचे मा.पोलीस आयुक्त ते अगदी पोलीस अंमलदार या पदांवरील सर्वाना माहीत आहेच राहिला प्रश्न मी या सर्वांना दिलेल्या भ्रष्टाचार कारभाराच्या पुराव्याचा व लेखी तक्रार अर्जाचा जे अर्ज महाराष्ट्र राज्य शासन ते केंद्रीय गृहमंत्री, मा.पंतप्रधान जी मे सर्वोच्य न्यायालय, मा.राष्ट्रपती, महाराष्ट्र राज्य येथील राज्यपाल, गृह विभाग यांना त्या तक्रार अर्जावर पुराव्यांवर या सर्व व्यवस्थेतील या सर्वांनी अविश्वास दाखवून त्यांना केराची टोपली दाखवली व सतत माझ्यावर खोट्या कारवाईला मला सामोरे जाण्या करता मला मानसिक, शारीरिक, आर्थिक छळ केला त्या नंतर मी मे उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या भ्रष्टाचार करणाऱ्यांना आव्हान दिले म्हणून या सर्वांनी मिळून वरील बेकायदेशीर काम करून स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी चुकीच्या पद्धतीने, हे गुन्हेगारी कृत्य केले.

पोलीस दलातील काही ठराविक सनदी अधिकारी, त्यांच्या सहकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्या नंतर पोलीस दलाची व शासनाची बदनामी होत नाही असा गोड गैरसमज आजही महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील, मुंबई पोलीस दलातील भ्रष्टाचार करणाऱ्या सनदी अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनि करून घेतलेला आहे कारण अशा सनदी अधिकारी व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस दलात आजही सक्षम नेतृत्व तयार झालेले नाही कारण पोलीस दलावर राजकारण्या चा या कामात मोठा बेकायदेशीर वरदहस्त आहेच मग ते कोणत्याही पक्षाचे शासन असो हे सर्वजण इलेट्रॉनिक व प्रिंट मीडियात एक बोलतात व नंतर एकत्र येतात हे सर्वश्रुत आहे या भ्रष्टाचार करणाऱ्या सनदी अधिकारी त्यांच्या सहकारी, राजकारणी यांच्या अभद्र युतीच्या माध्यमातूनच माजी पोलीस आयुक्त श्री परमवीर सिग, वाझे, काझी, शर्मा, पराग मनेरे, अकबर पठाण गँग ऑफ वझेपुर तयार झाली आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य पोलीस दलाची बदनामी झाली, महाविकास आघाडी सरकारच्या मा.गृह मंत्री याना त्या पदावरून पायउतार व्हावं लागलं हे सर्व मान्य करण्यास हे सर्व मात्र अजूनही धजावत कारण सनदी अधिकारी त्यांचे चेले चपाटे, शासन याना पारदर्शक कारभार च करायचा नाही हेच अधोरेखित सत्य आहे. सत्य व भ्रष्टाचार करणाऱ्या सनदी अधिकारी शासनाचे मा मंत्री, लोकनेते, राजकारणी यांनी भ्रष्टाचार उघड करणारांचे आवाज दाबण्या साठी अनेक गैर प्रकार,मनमानी कारभार, गुन्हेगारी कृत्ये केलेली आहेत व करत ही आहेत पण या प्रकरणात मी मा.सर्वोच्च न्यायालयात व मा उच्च न्यायालयात याचिका दाखल नक्कीच करणार आहे कारण पोलीस दलातील भ्रष्टाचार करणाऱ्या सनदी अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यां विरोधात केलेल्या तक्रारी आजही दाबून ठेवलेल्या आहेतच त्याचा ही योग्य निपटारा व या सर्वांच्या मनमानी बेकायदेशीर कामाचा लेखा जोखा सर्व सामान्य जनतेला माहीत होईल कारण गोरगरीब जनतेच्या टॅक्सच्या पैशातून हेच भ्रष्टाचार करणारे व मीही दर महा वेतन घेऊन माझ्या कुटूंबियां चा उदरनिर्वाह करत आहे आणि आपल्या देशातील राजकारण्यांचा सुद्धा उदरनिर्वाह याच जनतेच्या टॅक्स रुपी रकमेतून होत आहे मात्र, शासकीय सेवेत असणारे अधिकारी/कर्मचारी/मा.मंत्री, मा खासदार, मा आमदार, विरोधी पक्षनेते यांना त्याची जाणीव नाही जे की भ्रष्टाचार कारभारात लिप्त आहेत जय हिंद जय महाराष्ट्र !!

श्री सुनील टोके पोलीस दलातील भ्रष्टाचार प्रकरणांत बोलतात, मे उच्च न्यायालयात याचिका दाखल करतात यामुळे पोलीस दलाची बदनामी होते हे सिद्ध करण्यासाठी सुनील टोके यांचे cdr काढले ते ही बेकायदेशीर मग मनसुख हिरेन खून प्रकरणाचे किंवा कट कारस्थानचे, सर्व पुरावे गोळा करण्यासाठी, पूर्वनियोजित गुन्हेगारी कर्तृत्वाची माहिती विशेष शाखा मुंबई येथील तत्कालीन मा अपर पोलीस आयुक्त व सद्याच्या मा अपर पोलीस आयुक्त श्री कोल्हे, मा पोलीस उप आयुक्त, श्री शिवाजीराव राठोड व त्यांच्या विभागाच्या इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी/कर्मचारी यांनी मिळवण्यासाठी का ? प्रयत्न केले नाहीत की या गंभीर प्रकरणांत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त श्री परमवीर सिग आणि गँग ऑफ वझेपुर व 100 कोटी वसुली सरकार मान्यवर होते या सर्वांचे cdr काढले असते तर आज पोलीस दलाची व शासनाची बदनामी झाली नसती.

श्री जगदीश का. काशिकर हे या विचारांशी पुर्ण सहमत आहेत कारण त्यांनीसुध्दा तसा अनुभव घेतला आहे मुंबईतील अंधेरी – पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसायटी बाबत !!

श्री जगदीश काशीकर यांनी काेमल रहिवाशीची व आपली समस्या महाराष्ट्र सरकारचे पोर्टल “आपले सरकार” यावरसुध्दा मांडली व मंबई महानगरपालिकेला समस्येबाबत अवगत करून महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रीमंडळातील सहकारी तसेच निगडीत शासकिय प्रशासनास दिली आहे व काेमल रहिवाशीची समस्या सुटण्यासाठी त्वरीत हस्तक्षेप व गुन्हेगारयांवर कारवाई करण्याची विनंती केली आहे.

यासाठी त्यांनी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” हा फेसबुक ग्रुप (https://www.facebook.com/groups/485736278978687/)
त्यांनी शासकीय अधिकारी व जनतेच्या माहीतीसाठी बनविला आहे व ताे या देशातील सर्व जागरूक भारतीय जनतेने/नागरिकांनी कुपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती करत आहेत व ऊदया काेमल रहीवाशी साेसायटीमध्ये काही दुघँटना घडल्यास साेसायटीच्या आजी व माजी कमीटी सदस्य तसेच सभासदांवर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये हे ठरविण्याची वेऴ आली आहे !!

Leave a Comment