Palghar Nargrik

Breaking news

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्र्यांकडून पुन्हा एकदा लॉकडाऊनचा इशारा…..

देशात आज सर्वत्र स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत, कोरोना परिस्थितीचा अंदाज व्यक्त केला. महत्त्वाचं म्हणजे यावेळी त्यांनी पुन्हा एकदा लॉकडाऊनचा इशारा दिला. ऑक्सिजन पुरवठा ज्यावेळी कमी होईल तेव्हा लॉकडाऊन लागू शकतो, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘स्वातंत्र्याचा इतिहास फक्त लक्षात ठेवून आपण स्वातंत्र्यदिन साजरा करतो, पण ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या स्वातंत्र्याची जपणूक करणं आपली जबाबदारी आहे. गेल्या एक वर्षांपासून आपण कोरोना व्हायरसचा सामना करत आहोत. हे वेगळ पारतंत्र्य फक्त आपणचं नाही तर संपूर्ण जग अनुभवत आहे.’
त्यातूनही मुक्त होण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. उद्या 16 ऑगस्ट आहे. आपण अनेक बंधनांमध्ये शिथिलता आणली आहे. पण कोरोनाचं संकट अद्याप टळलेलं नाही. परदेशात काही ठिकणी पुन्हा कोरोना संकट उसळलं आहे. आपल्याकडे ते उसळू नये म्हणून आपल्याला खबरदारी घ्यायची आहे. आपण निर्बंधांमध्ये शिथिलता दिली आहे.

पुढे मुख्यमंत्री म्हणाले, ‘पण त्याचं बरोबर आपण इशाराही दिला आहे. कोरोनाचा कहर आपण दोन्ही वर्षी अनुभवला आहे. शिथिलता दिली असली तरी नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यास पुन्हा लॉकडाऊन लागू शकेल. लॉकडाऊन नको असल्यास सर्वांनी खबरदारी घेतली तर आपण त्यातून नक्कीचं बाहेर पडू.’ असं मुख्यमंत्री म्हणाले

Leave a Comment