Palghar Nargrik

Breaking news

रेड लाईट भागात पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स महिलांनी तोडले…..

रेड लाईट भागात अनेक गुन्हे सर्सास होत असतात. अवैध धंदे, गांजा-ड्रग्सच्या विक्रीसह गुंडांचा वावर वाढल्यामुळे गंगाजमुना परिसर  पोलिसांनी सील करत त्याठिकाणी  बॅरिकेट्स लावले होते. पण रेड लाईट एरिया गंगाजमुना भागात पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स आज राष्ट्रवादी नेत्या ज्वाला धोटे यांच्या नेतृत्वात वारांगणांनी मोडले. त्यानंतर  पोलीस प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. बुधवारी उपराजधानीतला ‘रेड लाईट एरिया’ गंगाजमुना परिसर पोलिसांनी सील केला होता.

 

अवैध धंदे, गांजा-ड्रग्सच्या विक्रीसह गुंडांचा वावर वाढल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी बुधवारपासून गंगाजमुना परिसर पूर्णपणे बंद केला. गंगाजमुनात मोठा पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला .दरम्यान ज्वाला धोटे यांनी पोलिसांच्या या कारवाईला तीव्र विरोध केला.

 

 

 

गंगा-जमुना येथे  कोरोना नियमांचं सर्रास उल्लंघन होत, वस्तीत  गुन्हेगारांचा वावर असून, काही दलाल अल्पवयीन मुलींकडून बळजबरीने देहव्यापार करवून घेतात, अवैध धंदे, गांजा-ड्रग्सची विक्री होत असल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांनी केला होता.परिसरातील नगरसेवक आणि प्रतिष्ठित नागरिकांनीही गंगाजमुनामुळे होणार्‍या त्रासाबाबत पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली.

 

त्याबाबत पोलीस आयुक्तांनी बुधवारी रात्री गंगाजमुना सील केला. गंगाजमुना वस्तीतील सर्व गल्लीत पोलिसांनी बॅरिकेट्स लावले. मात्र या सर्वांना ज्वाला धोटे यांनी तीव्र विरोध केला. एरिया सील केल्यानंतर वरंगणांनी तीव्र  रोष व्यक्त केला. पोलीस स्वत:चे अपयश लपविण्याकरता लक्ष  दुसरीकडे वळविण्यासाठी हा परिसर सील करून कारवाई करत असल्याचा आरोप ज्वाला धोटे यांनी केला आहे.

Leave a Comment