Palghar Nargrik

Breaking news

Nitin Landage पिंपरी चिंचवड लाच प्रकरण: भाजपच्या स्थायी समिती अध्यक्षाला २ दिवसांची कोठडी….

पिंपरी:पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांच्यासह पाच जणांना लाचखोरीच्या प्रकरणात दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) एक लाख १८ हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेत छापा टाकून बुधवारी नितीन लांडगे व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांना अटक केली होती. भाजपची एकहाती सत्ता असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेत एसीबीने अशा प्रकारे कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली होती. ( Nitin Landge Arrest Latest News )

महापालिकेच्या कामाचे टेंडर मंजूर झाल्यानंतर वर्क ऑर्डरसाठी एका ठेकेदाराकडे स्थायी समिती अध्यक्षांच्या नावाने दहा लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा लावून कारवाई करत अॅड. लांडगे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक, लिपिक, संगणक चालक आणि शिपाई अशा पाच जणांना अटक केली. ही कारवाई बुधवारी (१८ ऑगस्ट) महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये करण्यात आली. आज या सर्वांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. लांडगे यांच्यासह स्वीय सहाय्यक

Leave a Comment