Accident News : समृद्धी महामार्गावर तळेगाव येथे भीषण अपघात ( Accident on Samruddhi Mahamarg in Maharashtra) झाल्याची माहिती समोर येत आहे. लोखंडी सळई घेऊन जात असलेला ट्रक पलटी होऊन अपघात झाला असून या दुर्घटनेत तब्बल 13 जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या अपघातात काही मजूर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले आहे.
दुसरबीड येथून मजूर घेऊन समृद्धी महामार्गाच्या कामावर हे मजूर जात होते. त्यावेळी तळेगाव येथे हा अपघात झाला. समृद्धी महामार्गावर काम करणारे परप्रांतीय मजूर असल्याचे सांगण्यात येत आहे. एकूण ट्रकमध्ये 15 मजूर असल्याची प्राथमिक माहिती आहे. यापैकी 13 जणांचा मृत्यू झाल्याची वृत्त आहे.
बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम मोठ्या वेगात सुरू आहे. हा संपूर्ण महामार्ग लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठीच संपूर्ण महामार्गावर ठिकठिकाणी वेगाने महामार्गाचे काम सुरू आहे. शिर्डी ते नागपूर हा मार्ग दोन महिन्यात वाहतुकीला खुला करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे.