Palghar Nargrik

Breaking news

दहीहंडी उत्सवाच्या निर्णयाकडे गोविंदांचे लक्ष; मुख्यमंत्री आज घेणार बैठक……

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सव कशा पद्धतीने साजरा करायचा याबाबत आज मुख्यमंत्री महाराष्ट्रातील गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करणार आहेत. ऑनलाईन होणारी ही बैठक दुपारी १२.३० वाजता होणार आहे.

मागील वर्षी कोरानामुळे दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आला होता. यंदा काही अटी घालून साधेपणाने हा उत्सव साजरा करण्याची परवानगी दिली जावी का याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

दरवर्षी दहीहंडीच्या आधी काही दिवस गोविंदा पथके सराव करत असतात, पण आता दहीहंडी आठ दिवसांवर आली तरी गोविंद पथकांचा सरावही सुरू झालेला नाही. त्यामुळे यंदाच्या दहीहंडीबाबत मुख्यमंत्री काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

Leave a Comment