नगरपालिका क्षेत्रात सध्या जी विकास कामे चालू आहेत ती अनावश्यक ठीकाणी चालू आहेत, सरकारी विकास योजनांचा लाभ काही विशिष्ट कंत्राटदार आणि नगरपालिकेतील सत्तेत असलेले पदाधिकारी यांना होताना दिसतो.
नगरपालिकेने जास्त जबाबदारीने वागायला पाहिजे कंत्राटदारांकडून मिळणारे पैसे आणि बांधकाम परवानगीतून मिळणारे पैसे येवढ्यापुरतीच आपली हुशारी न दाखवता लोक उपयोगी,लोकांच्या अडचणी दूर करणारे काम सुद्धा करायला पाहिजेत.
डहाणू पूर्वेला कुठेतरी आदिवासी विकास योजनेतून पैसे मिळतात म्हणून जिथे 4-5 घर सुद्धा नाहीत अशा ठिकाणी 50 – 60 लाख रुपये खर्च करून रस्ता केला असं बोललं जातं.
स्टेशन परिसरातील वाहतूक आणि पार्किंगची समस्या, सर्व रस्त्यांवर फेरीवाल्यांची समस्या, रस्त्याला पडणारे खड्डे , प्रलंबित पाणीपुरवठा योजना इत्यादींवर लक्ष देणे जरुरीचे आहे.
नगरपालिकेची जुनी इमारत धोकादायक आहे म्हणून नगरपालिका कार्यालय भाडेतत्त्वावर घेतलेल्या जागेत स्थलांतरित केले, माझ्या माहितीप्रमाणे त्या स्थलांतरित जागेचे भाडे जवळजवळ एक कोटी देणे बाकी आहे, आणि काही दिवसांपूर्वी जुनी नगरपालिकेची इमारत धोकादायक म्हणून जाहीर केली होती त्याची ठीकाणी नगरपालिकेने खर्च करून वाचनालय सुरु केले, सुरु केलेल्या दिवसापासून आज पर्यंत किती लोकं वाचनालयात आली आणि किती लोकांना त्याचा फायदा झाला हे तरी लोकांना कळू देत.
डहाणूत जनता बँकेची एक कार्डियाक ॲम्बुलन्स आहे तिचं आता करोना रुग्ण कमी झाल्यानंतर युटीलाईजेशन 50% सुद्धा नसते, नगरपालिकेने अशा वेळेस दुसरी काही तरी लोक उपयोगी योजना करायला पाहिजे होती, त्याऐवजी लहान मुलासारखं अहंकाराने त्यांनी अजून एक कार्डियाक ॲम्बुलन्स आणली, तीही रुग्ण विना महिन्यातून अनेक दिवस नुसतीच उभी राहणार, आणि काही वर्षांनी अपेक्षित सेवा न देता खराब होणार, हा पैशाचा अपव्यय थांबायला पाहिजे.
लोकांना सेवा देण्यासाठी सुसंगत, सहकार्याने,जबिबदारीने वागले पाहिजे, अहंकारी शर्यत नको.