ठाणे महापालिकेच्या (Thane Municipal ) माजिवाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे (Kalpita Pimple) आणि त्यांच्या अंगरक्षकावर फेरीवाल्याकडून जीवघेणा हल्ला केला. (Hawker Attack) या हल्ल्यात कल्पिता यांची तीन बोटे छाटली गेलीत. त्या सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी ठाणे (Thane) येथे जावून कल्पिता यांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांना धीर देत लवकर बरे व्हा, असे सांगितले.
कल्पिता पिंपळे (Kalpita Pimple) या फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यात जखमी झाल्या आहेत. फेरीवाल्यांवर कारवाई करताना त्यांच्यावर हल्ला झाला होता. सध्या कल्पिता पिंपळे यांची प्रकृती स्थिर आहे. राज ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन कल्पिता पिंपळे यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. लवकर बरे व्हा हे सांगायला आलो, बाकीचे आम्ही बघतो, असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले. कल्पिता पिंपळे (Kalpita Pimple) यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकर यांनी फेरीवाल्यांना पुन्हा दिला आहे.