Hawker Attack : फेरिवाल्याच्या (Feriwala) हल्ल्यात जखमी झालेल्या ठाणे महापालिका (Thane Municipal ) सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे (Kalpita Pimple) यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी आज फोनवरुन चौकशी केली. तुम्ही लवकर बरे व्हा, कारवाईची जबाबदारी आमची असे, आश्वासन त्यांनी यावेळी त्यांना दिले. दरम्यान, याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन पिंगळे यांची भेट घेतली. त्यांनी यावेळी फेरिवाल्याला इशाराही दिला आहे.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी कल्पिता यांच्या कामाचे कौतुकही केले. तसेच ठाणे पालिका आयुक्तांकडून अतिक्रमण विभागाच्या सुरु असलेल्या कारवाईचीही माहिती घेतली. दरम्यान खटला लढवण्याकरता विशेष वरिष्ठांची वकिलांची नेमणूक सरकार करणार आहे. अमरजीत यादव याला जास्तीत जास्त कारवाई होईल याबाबत सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कल्पिता पिंपळे यांची भेट; तुम्ही बऱ्या व्हा, बाकीचे आम्ही बघतो – राज ठाकरे
महापौर नरेश म्हस्के आणि पालिका आयुक्त विपीन शर्मा यांच्या उपस्थितीत कल्पिता पिंपळे यांची फोनवरून विचारपूस केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे महापालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांना फोन केला. कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरिवाल्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात त्यांच्या हाताचे बोटे छाटली गेलीत. सध्या कल्पिता पिंपळे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कल्पिता पिंपळे यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. यावेळी मुख्यमंत्रीठाकरे यांनी कल्पिता पिंपळे यांचे कौतुक केली. तुम्ही लवकर बरे व्हा, तुम्ही बरे झाल्यावर तुम्ही पुन्हा जे काम करणार आहात, आता तुमच्याबरोबर आमची सुद्धा ती जबाबदारी, असेल अशा शब्द यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला.