Palghar Nargrik

Breaking news

राष्ट्रवादी महिला काँग्रेस नासिक शहराकडून पंतप्रधानांना शेणाच्या गोवऱ्या भेट …..

दिवसेंदिवस पेट्रोलियम कंपन्यांकडून गॅस सिलेंडरच्या किमतीत भरमसाठ वाढ होत आहे याचा निषेध करत राष्ट्रवादी महिला काँग्रेस नासिक शहराध्यक्षा अनिता भामरे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना शेणाच्या गोवऱ्या पोस्टाने भेट पाठवून महिला पदाधिकारींनी आपला संताप व्यक्त केला.
गेल्या दिड वर्षापासून देशात कोरोना रोगामुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या तर अनेकांचे रोजगार बुडाले अशा कठीण परिस्थितीत महागाई वाढत असल्याने सामान्य माणसाला जीवन जगणे नकोसे झाले आहे. महागाईचा आलेख दिवसागणिक वाढत असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना गरिबांच्या जीवनाशी काही देणेघेणे दिसत नाही. देशाचा विकास दाखवतांना सामान्य जनतेचे जीवन मात्र पंतप्रधानांनी भकास करून टाकले.


१ जानेवारी २०२१ पासून आजपर्यंत घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत तब्बल रूपये १९० ची दरवाढ करण्यात आली असून अनुदान मात्र बंद करण्यात आले आहे. केंद्रात भाजपचे सरकार सत्तेत येण्याआधी १ मार्च २०१४ रोजी मिळणारे गॅस सिलेंडर रूपये ४१० किमतीचे आज रूपये ९०० पर्यंत जाऊन पोहोचले. यामुळे सर्व सामान्य महिलांचे किचन बजेट संपूर्ण पणे कोलमडले आहे. महिलांनी वारंवार आंदोलन करूनही केंद्रातील सरकार मात्र ढिम्म बसून गंमत पाहतांना दिसते.
गॅस सिलेंडरची दरवाढ असह्य होत असल्याने केद्रांतील भाजप सरकारचा निषेध करीत आज पोस्टात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना शेणाच्या गोवऱ्या पार्सल म्हणून भेट पाठवितांना राष्ट्रवादी महिला काँग्रेस नासिक शहराध्यक्षा अनिता भामरे, पूर्व विभाग अध्यक्ष सलमा शेख, पश्चिम विभाग अध्यक्ष योगिता आहेर, पंचवटी विभाग अध्यक्ष सरीता पगारे, नासिक रोड विभाग अध्यक्ष रूपाली पठारे, शहर पदाधिकारी शाहिन शेख, सलमा शेख आदि महिला उपस्थित होत्या.

Leave a Comment