Palghar Nargrik

Breaking news

बहुजन विकास आघाडीच्या पाठपुराव्याला यश वसई विरारकरांना मिळणार १ लाख लस ….

वसई तालुका आणि पालघर जिल्ह्याला इतर जिल्ह्याच्या तुलनेत कमी प्रमाणात लस येत असताना बहुजन विकास आघाडीचे सर्वोसर्वा हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे सहकारी जिल्हा सह वसई विरारला लस उपलब्ध व्हावी म्हणून सातत्याने प्रयत्न करत होते. आमदार क्षितिज ठाकूर आणि माजी महापौर प्रवीण शेट्टी राज्य सरकारकडे लसी साठी खिंड लढवत होते तर आमदार राजेश पाटील ,माजी महापौर नारायण मानकर, माजी खासदार बळीराम जाधव , काशिनाथ पाटील हे दिल्लीला लस मिळावी म्हणून प्रयत्न करत होते त्या प्रयत्नाला अखेर यश आले असून उद्या १ लाख लस वसई विरारकरताना उपलध झाली असून आमदार हितेंद्र यहांकुर यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.


आज वसई तालुक्यातील विविध प्रश्नांबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेशजी टोपे साहेब यांची आमदार क्षितीज दादा ठाकूर यांनी ४ भेट घेऊन येथील लसीकरणा बाबतची परिस्थिती त्यांना सांगितली होती त्यावेळी लवकरच आपण लसीचा साथ उपलब्ध करून देऊ असे आश्वासन क्षितिज ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्ट मंडळाला त्यांनी दिले होते. .


तर दुसर्या बाजूला बोईसरचे आमदार राजेश पाटील , माजी महापौर नारायण मानकर, माजी खासदार बळीराम जाधव यांनी पालघरजिल्ह्याला लस मोठ्याप्रमाणात उपलध व्हावी यासाठी १० ऑगस्टला केंद्रीय आरोग्य मंत्री भरती पवार यांची भेट घेतली होती त्यावेळी त्यांनी इतर जिल्ह्याच्या प्रमाणात लसी बाबत पालघर जिल्ह्यावर अन्याय होत असल्याची तक्रार केली होती तसेच त्यांना येथील आरोग्याचे प्रश्न सांगितले. त्यावर पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागामध्ये आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी काय काय योजना आखण्यात याव्यात तसेच बालमातेचे प्रमाण थांबवण्यासाठी आणि आदिवासी बहुल भागातील गरोदर आणि स्तनदा माता यांच्या आरोग्यासाठी ठोस उपाय करण्याची तिव्र इच्छा राज्यमंत्री मा.डाॅ. भारती पवार यांनी व्यक्त केली. त्या नाशिक च्या असल्याने पालघर जिल्हा हा माझ्या शेजारचा जिल्हा असल्याने वैयक्तिक लक्ष देण्याचे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले होते. परंतु इतके महिने निद्रिस्त असलेले काही आत्मे आता आम्ही केलेल्या प्रयत्नांचे श्रे घेण्यासाठी पुढे येत आहेत. असे असले तरी लोकांनाही माहिती आहे. कोण काम करते ते असा टोला यावेळी बविआचे नेते आणि माजी महापौर प्रवीण शेट्टी यांनी नाव न घेता विरोधकांना मारला आहे.

Leave a Comment