Palghar Nargrik

Breaking news

अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ, ईडी, सीबीआय आणि आता आयकर विभागाचे छापे…..

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यासमोरच्या अडचणी कमी होण्याची चिन्ह नाहीत. ईडी (ED) आणि सीबीआयनंतर (CBI) आता आयकर विभागाने (Income Tax Department) अनिल देशमुख यांच्या घरांवर छापे टाकले आहेत. अनिल देशमुख यांच्या नागपूर (Nagpur) इथल्या घरी आज सकाळी 11.30 च्या दरम्यान आयकर विभागाने झाडाझडती घेतली. (Income Tax department raids on maharashtra ex home minister Anil Deshmukh Residence in Nagpur and mumbai house)

नागपुरामधील (Katol) काटोल, मुंबईतील ज्ञानेश्वरी आणि NIT कॉलेजवर आयकर विभागाने छापा टाकून झाडाझडती केली. याआधी अनिल देशमुख यांच्या घरांवर ईडी आणि सीबीआयाने दोन वेळा धाडी टाकल्या होत्या.

अनिल देशुख यांना आतापर्यंत ईडीने चार वेळा समन्स बजावलं आहे. पण अनिल देशमुख एकदाही ईडीसमोर चौकशीसाठी हजर झालेले नाहीत. याआधी 25 जून, 26 जून 5 जुलै आणि 2 ऑगस्टला ईडीने समन्स बजावलं होतं.

काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parmbir Singh) यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप केले होते. याप्रकरणी परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिलं होतं. सचिन वाझे (Sachin Vajhe) आणि अन्य काही पोलीस अधिकाऱ्यांना देशमुख यांनी 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा आरोप परमबिर सिंह यांनी या पत्रात केला होता.

मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत, आणि प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये घेतले तरी महिन्याला 40 ते 50 कोटी वसूल होतील, असा आरोप सिंह यांनी या पत्रात केला होता. या आरोपांनंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

Leave a Comment