Palghar Nargrik

Breaking news

राज्यात पुढील 48 तासांत जोरदार पावसाची शक्यता….

राज्यात पुढील 48 तासांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. पुढच्या 4,5 दिवसात राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. विजा चमकताना बाहेरची कामं टाळा, हवामान विभागाचा इशारा आहे.

पुढच्या 4,5 दिवसात राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता.
विजा चमकताना कृपया बाहेरचे काम टाळा, त्या वेळी घराबाहेर पडू नका, त्यात जीवाला धोका असू शकतो.शक्यतो, अशा प्रकारचे तीव्र हवामान दुपार नंतर ‌संध्याकाळी व रात्री पर्यंत असते.
IMD ने दिलेले इशारे पहा pic.twitter.com/IwZkHyzTGR

राज्यातील मोसमी पावसाचा अधिकृत हंगाम सप्टेंबर महिन्यात संपलाय आहे. मात्र, ऑक्टोबर महिन्यात मोठ्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. येवल्यात आजही धुक्याची चादर पसरलीय. सकाळी धुकं इतकं दाट होतं की समोरचं काहीच दिसत नव्हतं. दाट धुक्यामुळे करपा आणि मावा रोगाचा पिकावर प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची चिन्ह आहेत.

येवल्यात मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अंदरसूलमध्ये काढून ठेवलेला मका पावसानं भिजला. अक्षरश: एक एक मक्याचं बीटी गोळा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ओल्या झालेल्या पिकाला कोंब फुटल्यानं हातातोंडाशी आलेलं पिक वाया गेलं आहे.

येवला तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बळीराजाच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अंदरसूल इथे शेतात काढून ठेवलेलं मका पीक मुसळधार पावसाने भिजून गेल्याने अक्षरश: एक एक मक्याचं बीटी गोळा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ओलं झालेल्या पिकाला कोम फुटल्याने मोठ्या नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावं लागत आहे.

Leave a Comment