डोंबिवलीत (Dombivali) कायदा सुव्यवस्था उरली आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही दिवसांपूर्वीच एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेने डोंबिवली हादरली होती. आता पुन्हा एकदा डोंबिवलीत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
डोंबिवलीमधल्या ठाकुर्ली 90 फिट रोडवर काल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात इसमाने चोरीच्या उद्देशाने दोन प्रवाशांवर हल्ला केला. रिक्षातून आलेल्या या इसमाने आधी या दोन प्रवाशांना बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याने धारदार शस्त्राने एका प्रवाशाचा गळा चिरला आणि त्याला रेल्वे ट्रॅकवर फेकून दिलं. या दुसरा प्रवासी झाडीमध्ये लपल्यानं त्याचा जीव वाचला.
मृत व्यक्तीचं नाव बेलप्रसाद चौहान असं आहे. तर जखमी प्रवाशाचं नाव बबलू चौहान आहे. लूटीच्या हेतून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.