दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शुक्रवारी जागतिक अंडी दिन साजरा केला जातो. या वर्षी देखील पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद पालघर व पंचायत समिती पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अंडी दिन दिनांक ८/१०/२०२१ रोजी शासकीय आश्रमशाळा बेटेगाव येथे साजरा करण्यात आला. यावेळी प्रतिभा गुरोडा सभापती पशुसंवर्धन यांनी विद्यार्थ्यांना आहारातील अंड्याचे महत्व सांगून अंड्यातील रोजसुदृढ आरोग्यासाठी अंड्याचे नियमित सेवन करणे फायदेशीर आहे. मानवी आहारामध्ये हजारो वर्षांपासून अंड्यांचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. आपल्या शरीरासाठी पोषक असणारी सर्व जीवनसत्त्वे आणि खनिजे अंड्यामध्ये आढळतात. असे मत यावेळी सभापती गुरोडा यांनी व्यक्त केले.
बांधकाम सभापती शीतल धोडी यांनी अंड्यातील जीवनसत्त्वे, खनिजे ही मेंदू आणि मज्जासंस्थेला प्रभावीपणे कार्य करण्यासाठी आवश्यक असतात असे सांगितले.
तर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ संजीत धामणकर यांनी अंड्यांमधून ऊर्जा, प्रथिने, कार्बोहायड्रेट, कोलीन, व्हिटॅमिन ए,डी,बी-६, बी-१२, – अंड्यातून फॉस्फेट, आयर्न, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम पोषणमूल्ये मिळतात असे सांगून अंड्यांचे महत्व पटवून दिले.
डॉ राहुल संखे पशुधन विकास अधिकारी यांनी संडे असो वा मंडे, रोख खा अंडे! सांगून आपण किती अंडी खातो याचा विचार केला पाहिजे. अंडे शरीरासाठी अधिक ऊर्जा देणारा घटक आहे. तुम्हाला तंदुरुस्त राहण्यासाठी वर्षभरात किमात १८० अंडी खाण्याची आवश्यकता आहे. म्हणजेत महिन्यात १५ अंडी पोटात जाणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगितले.
पंचायत समिती सदस्य आनंद धोडी यांनी अंडी रोज उकडून खाल्याने अधिक पोषक घटक मिळतात असे सांगितले. यावेळी कार्यक्रमात उपस्थित मान्यवर डॉ सोनावले पशुधन विकास अधिकारी , मुख्याध्यापक म्हात्रे , अजय पाटील स्वीय सहायक यांनी अंडी वाटप करून विद्यार्थ्यांना अंडी खाण्याचे फायदे पटवून दिले.