Palghar Nargrik

Breaking news

पालघर तालुक्यातील दूर्वेस गावातील काटेल पाडा राष्ट्रीय महामार्गावरून हाकेच्या अंतरावर असूनही अजूनही रस्ता नाही…..

त्यात एका बाजूला नदी त्यामुळे पावसाळ्यात एखादा व्यक्ती आजारी पडला तर डोली करूनच रुग्णालयात न्यावे लागते अशी स्थिती आजही आहे.आजही तेथील विद्यार्थ्यांना बांधावरून झाडी झुडूपातून शाळेत जावे लागते.पालघर जिल्हा केंद्रातून अर्ध्यातासाच्या अंतरावर असलेल्या गावाची ही अशी स्थिती आहे.त्यात या पाड्याच्या बाजूला आलेल्या हेरिटेज फूड या कंपनीनेही रस्त्याची जागा अडउन या पाड्यातील नागरिकांच्या दुःखात अजून तेल ओतण्याचे काम केले आहे या पाड्याला आज आपल्यासाठी आपला माणूस आदिवासी एकता मित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष जनाठे यांनी मंडळाचे खजिनदार मंगेश गोंड व कार्यकर्त्यांसह भेट दिली व सदर रस्त्या संबंधी गावातील नागरिकांसमोर बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांशी बोलणे केले तसेच नजीकच्या काळात रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी आंदोलनाचे जे जे मार्ग अवलंबावे लागतील ते अवलंबू असे ग्रामस्थांना आश्वासन दिले.

Leave a Comment