भारतीय मराठा महासंघाची संघटना बांधणी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब आहेर आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. बन्सीदादा डोके यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात अत्यंत जोमाने सुरु आहे. विभागीय बैठकांच्या माध्यमातून संघटना बांधणीचा आढावा घेऊन समान नागरी कायदा, आरक्षणमुक्त हिंदुस्थान, रोजगार-स्वयंरोजगार, महिला सक्षमीकरण, कृषी व कामगार सबलीकरण, भूमिपुत्र हक्क संवर्धन यांसह विविध सामाजिक विषयांवर महाराष्ट्र ढवळून काढण्याचा संघटनेचा मानस आहे.
आज दिनांक २१ ऑक्टोबर २०२१ रोजी ठाणे येथील विश्रामगृहात ठाणे पालघर विभागीय आढावा बैठक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या उत्साही गर्दीत पार पडली.
राष्ट्रीय अध्यक्ष माननीय डॉ. आप्पासाहेब आहेर, प्रदेश अध्यक्ष माननीय श्री. बन्सीदादा डोके यांच्यासह
राष्ट्रीय सरचिटणीस राम शिंदे राष्ट्रीय सचिव राजेंद्र जगदाळे, प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ता राजन गावंड, प्रदेश उपाध्यक्ष श्री. संजय मिरगुडे, कोकण विभागीय सरचिटणीस श्री. शिवाजीराव पालांडे, ठाणे जिल्हा अध्यक्ष किशोर पवार, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष श्री. मनोहर सुगदरे, ठाणे महिला जिल्हा कार्याध्यक्षा सौ. श्रेयाताई तटकरे, ठाणे शहर अध्यक्ष निलेश देसाई, ठाणे शहर अध्यक्षा सौ. सुवर्णा शेट्टी, इंदुमती पेठे, अर्चना शिर्के, अमित मामुणकर, विजय भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते. महासंघाच्या कार्यकर्त्यांखेरीज पालघर, ठाणे व नाशिक आदी ठिकाणाहून अनेक प्रतिष्ठित महिला पुरुष नागरिकांनी समक्ष हजर राहून संघटनेत सामील होण्याची ईच्छा प्रदर्शित केली.