Palghar Nargrik

Breaking news

जिल्हा परिषदे मार्फत केळवे बीच स्वच्छता मोहिम ….

पालघर-स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यतील प्रसिद्ध पर्यटन स्थळ केळवे बीच येथे परिसर स्वच्छता व प्लास्टिक संकलन मोहीमेचे आयोजन आज दि.२९/१०/२०२१ रोजी सकाळी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद पालघर, पंचायत समिती पालघर , ग्रामपंचायत केळवे यांचे संयुक्त विद्यमाने केले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदेही वाढाण, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिग्रावियंचे प्रकल्प संचालक तुषार माळी, जिपास्वमिचे प्रकल्प संचालक अतुल पारसकर,केळवे ग्रामपंचायतीच्या सरपंच भावना किणी, सर्व विभाग प्रमुख, सर्व शासकिय व निमशासकिय कर्मचारी तसेच, लायन्स क्लब केळवे, पर्यावरण संवर्धन मंडळ केलवे, हॉटेल असोससिएशन, केळवे, ग्रामसेवक युनियन,पालघर, विविध सेवा भावी संस्था, महिला बचत गट, ग्रामस्थ पत्रकार उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थितांच्या सहकार्याने संपुर्ण केळवे बीच व परिसर स्वच्छ करण्यात आला.

जिल्हा परिषदे मार्फत राबवण्यात आलेल्या हा स्तुत्य उपक्रम असून सर्व खातेप्रमुख,ग्रामस्थ यांनी उत्साहाने स्वच्छता मोहिमेत भाग घेतल्या बद्दल त्यांचे कौतुक करते.या वेळी कापडी पिशवी चा वापर करा आणि प्लास्टिक वर बंदी आणा हाच संदेश या मोहिमेतून देते.तसेच स्वच्छतेची सुरुवात आपल्या घरापासून करावी, सर्व समुद्रकिनारे ग्रामपंचायत किंवा गुड मॉर्निंग पथका द्वारे केली तर पर्यटन स्थळे असणारे समुद्रकिनारे निश्चितच स्वच्छ व सुंदर राहतील असे प्रतिपादन यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढाण यांनी केले.

या स्वच्छता मोहिमेतून मोठ्या प्रमाणात प्लास्टीक कचरा गोळा करून घंटागाडीतुन डम्पिंग ग्राऊंडवर वर नेण्यात आला.

Leave a Comment