Palghar Nargrik

Breaking news

आ. निकोले यांनी दिला विद्यार्थ्यांना न्याय..!# तारापूर अणुऊर्जा प्रकल्पावरील आंदोलन यशस्वी……..

पालघर / तारापूर. ( सिमा करोटिया ) – तारापुर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांना अणूऊर्जा केंद्रीय विद्यालयाने गेल्या 06 महिन्यापासुन शिक्षणापासून वंचित ठेवून केलेल्या अन्यायाविरोधात विद्यार्थ्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉ. विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या जोरदार आंदोलन यशस्वी झाले असून विद्यार्थ्यांचे शिक्षण व प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

यावेळी आमदार कॉ. निकोले म्हणाले की, राज्यात शिक्षणाचा अधिकार हा कायदा असताना केंद्र सरकार च्या अखत्यारीतील विषय त्यात अणुऊर्जा हा विषय थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडे असल्याने पालघर जिल्ह्यातील तारापूर परिसरातील आमच्या विद्यार्थ्यांना केंद्रीय विद्यालयाने गेली 06 महिने शिक्षणापासून वंचित ठेवले हे अत्यंत अन्यायकारक असल्याने विद्यार्थ्यांचा मोर्चा निघाला याचे नेतृत्व आमच्या द्वारे करण्यात आले. दरम्यान पालघर तालुक्यात बोईसर येथील अक्करपट्टी – पोफरण या प्रकल्पग्रस्त गावातील विद्यार्थांना तारापुर अणुऊर्जा केंद्रीय विद्यालयाने 06 महिने शाळेच्या हजेरी पटावर नाव कमी करुन, ऑनलाइन शिक्षणापासुन वंचित ठेवले होते. त्याचबरोबर फि वाढही केली होती. त्या विरोधात भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), एस.एफ.आय, डि. वाय. एफ. आय, किसान सभा, जनवादी महिला संघटना यांच्या संयुक्तरित्या आमदार कॉ. विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली के. पी. नगर मैदानातून रॅली काढून अणुकेंद्र वसाहत टी.ए.पी.एस. गेट समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलन दुपारी 02.00 वाजेपासुन संध्याकाळी 07.30 वाजेपर्यंत मागण्या मान्य होईपर्यत आंदोलक ठाण मांडून बसले होते.

शेवटी टी. ए. पी. एस. एस केंद्रीय विद्यालयाने शिष्टमंडळाला बोलावून मागण्या मान्य करुन विद्यार्थांना दि. 29/10/2021 पासुन पुन्हा प्रवेश प्रक्रिया करुन विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे मान्य केले. आंदोलनाचे नेतृत्व आमदार कॉ. विनोद निकोले यांच्यासह कॉ. चंद्रकांत गोरखना, कॉ. सुनिल सुर्वे, कॉ. हर्षद लोखंडे, कॉ. मधुकर डवला, कॉ. मगन दाभाडे, कॉ. विलास भुयाळ, कॉ. हरेश वावरे, कॉ. जॉन, कॉ. चंद्रकांत वरठा, कॉ. भगवान लहांगे, कॉ. संजीव सामंतुल, कॉ. संजय कांबले, विद्यार्थांचे पालक कॉ. लोचन चौधरी, कॉ. संतोष तामोरे, डॉ. आदीत्य अहिरे, कॉ. मोहन पिल्ले, कॉ. दिनेश चौव्हान, कॉ. ब्रिजेश यादव, कॉ. शिवा व तालुक्यातील इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment