Palghar Nargrik

Breaking news

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते बारामती येथे 5 बोलेरो वाहनांचे केले तालुकाध्यक्षांना वितरण…..

विक्रमगडचे आमदार आपला माणुस ????सुनिल चंद्रकांत भुसारा जिल्हाध्यक्ष पालघर यांनी राष्ट्रवादी ⏰पक्षाच्या अधिक मजबुत बांधणीसाठी पक्षासाठी धावणाऱ्या धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांची वाहनाअभावी गैरसोय होऊ नये म्हणून स्वखर्चाने अनुक्रमे ५ तालुकाध्यक्षांना नवीन बोलेरो निओ या वाहनांचे वितरण आदरणीय देशाचे नेते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते आज बारामती येथे केले. भुसारा यांच्या या निर्णयाचे पवार साहेब, सुप्रिया ताई, अजितदादा, रोहितदादा यांनी तोंडभरुन कौतुक केले वैयक्तिक स्वखर्चातुन पक्षाच्या तालुकाध्यक्षांना पक्षाच्या कामासाठी वाहन उपलब्ध करुन देणारा राज्यातील पहिला जिल्हाध्यक्ष असा मानही भुसारा यांना मिळाला आहे.
यावेळी जिल्हाउपाध्यक्ष प्रमोद अण्णा कोठेकर, मोखाडा तालुकाध्यक्ष अशोक मोकाशी,विद्यार्थी शहराध्यक्ष तनवीर तांबोळी,बंधू कैलासजी भुसारा आदि पदाधिकारी यांच्या ताब्यात प्रातिनिधिक स्वरुपाच्या चाव्या देण्यात आल्या असून सध्या या दोन बोलेरो प्राप्त झाल्या असून लवकरच उर्वरित 3 वाहने ताब्यात आल्यानंतर याचेही वाटप होणार आहे. तालुकाध्यक्षांना अशी वाहने देणार असल्याचे भुसारा यांनी या आधी अनेकदा पक्षाच्या बैठकांत सांगितले होते हे आश्वासन कृतीत आणल्यानंतर त्यांच्या ” एक बार मैने कमेंटमेंट करदी तो मै अपनी आप कि नही सुनता” हा भुसारांचा डायलॉग मात्र नेहमीप्रमाणेच सत्यात उतरला आहे.

Leave a Comment