पालघर: शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पालघर पोलिसांतर्फे काल रात्री ११ ते सकाळी ६ वाजे दरम्यान ‘ऑपरेशन ऑल आउट’ हे अभियान राबविले. पोलिसांनी पालघर मध्ये सुमारे ३५ ठिकाणी कारवाई (कोम्बिंग) करून १२ फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या. जिल्हा पोलीस अधीक्षकांसह ३९ पोलीस अधिकारी व २९० पोलीस अंमलदारांनी रात्रभर हे अभियान राबवून नियम मोडणार्या ३४ आस्थापना व १४८ वाहनधारकांवर कारवाई तसेच ४ फरार आरोपींना अटक, दारुबंदीचे ५ गुन्हे व ९८ निगराणी बदमाशांची एकाच वेळी तपासणी करण्यात आली.
तसेच १६ फेबु्रवारी रोजी रात्री ११ वाजता हे अभियान सुरु होऊन दुसर्या दिवशी सकाळी ६ वाजता संपले.जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिदे यांच्या नेतृत्वाखाली अपर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे प्रभारी अधिकार्यांच्या सक्रीय सहभागातुन ऑपरेशन ऑल आऊट राबविण्यात आले.
जिल्ह्यातील गुन्हेगारांवर वचक बसावा, गुन्हेगारी नियंत्रणात यावी, तसंच ३१ डिसेंबरच्या अनुषंगानं काही गैरकृत्य होऊ नये, यासाठी पालघर जिल्ह्यात पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे मिशन राबवण्यात आलं. यात प्रामुख्यानं नाकेबंदी, कोंबींग ऑपरेशन, अडगळीच्या जागा शोधणं, संशयीत आणि रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांची चौकशी करणं अशी कामं मिशन ऑलआऊटमध्ये करण्यात येतात. हे अभियान एकुण महत्वाच्या ३ टप्प्यांमध्ये पार पाडण्यात आले. (१)यात नाकाबंदी, अॅक्शन टिम/हंटर टिम- कारवाई पथक व कोम्बिंग ऑपरेशनचा समावेश होता. (२)अशाप्रकारचे अभियान पालघर जिल्ह्यामध्ये प्रथमच अत्यंत प्रभाविपणे राबविण्यात आले. पालघर जिल्हा पोलीस दलाने १६ पोलीस ठाणे हद्दीमध्ये २६ महत्वाच्या ठिकाणी एकाच वेळी नाकाबंदी लावली होती. (३) तसेच पहाटेच्या वेळी गुन्हेगारांच्या आश्रयस्थान असलेल्या एकुण २४ वस्त्यांमध्ये एकाचवेळी कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.
यादरम्यान पोलीस आयुक्त किंवा सहपोलीस आयुक्तांमार्फत आदेश दिले जातात. यावेळी ठराविक कालावधीसाठी कर्तव्यावर असलेले सर्व पोलीस सज्ज होतात. सर्व विभागांचे पोलिस उपायुक्तही या मोहिमत सहभागी होतात. या मोहिमेदरम्यान विभागात, पोलिस ठाण्याच्या हद्दीत या कालावधीत नेमकी कोणती कारवाई केली, याची माहिती तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली जाते.