Palghar Nargrik

Breaking news

घोलवड➖ मटका ,जुगार ,दमन दारू चालवणारा हरचंद इराणी करतोय आदिवासी महिलांची फसवणूक…..

घोलवड:- घोलवड च्या हद्दीतील हरचंद रोईडन इराणी हा काही वर्षापासून खेड पाडा या ठिकाणी अक्षय बियर शॉप मध्ये गुजरात दमणचा बेकायदेशीर दारू विकतो व तसेच हे दुकान शाळा, ग्रामपंचायत, अंगणवाडी हे सर्व बियर शॉप च्या बाजूलाच असून कायद्याप्रमाणे कमीत कमी १०० मिटर अंतरावर असले पाहिजे, म्हणून त्या बियर शॉप परवाना रद्द करावा व तसेच व्याज वरती पैसे देऊन, लोकांकडून जबरदस्ती वसूल करून, मटका ( जुगार ) सुद्धा खेळवून लोकांना बरबाद करण्याचे काम करीत आहेत. तसेच पैशाचा माज आल्यामुळे आदिवासी अशिक्षित महिलांबरोबर शारीरिक संबंध ठेवून लोकांचे संसार उध्वस्त करीत आहे. आणि तसे त्यांनी पहिली पत्नी आदिवासी समाजाची श्रीम. गुलाब विष्णू हाडळ रा.खेडपाडा या ठिकाणांची आहे. व दुसरी पत्नी सुद्धा आदिवासी समाजाचीच असून, देवाय ही बाकी डोंगरी पाडा या ठिकाणची आहे. व आता त्याने तिसरी पत्नी आदिवासी समाजातलीच श्रीम. संगीता महेंद्र गवळी ही बाकी डोंगरी पाडा या ठिकाणची असून, तिला पळवून एक महिना झाला आहे. आणि तिचे लहान लहान चार मुले असल्यामुळे त्यांच्या घरामध्ये त्यांच्या परिवारामध्ये उपासमारीची पाळी आणणारा हरचंद इराणी यांनी केले आहे. व तसेच अनेक महिलांची फसवणूक आजपर्यंत त्याने केली आहे. व काही आदिवासीची जमीन सुद्धा त्याच्या वाडीमध्ये असल्यास त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत आहे. अशा व्यक्तीवर कायदेशीरपणे आदिवासी अत्याचार कायद्याखाली ॲट्रोसिटी ॲक्ट दाखल करावा व तसेच ह्या तिन्ही महिलांना त्याच्या जमिनीमध्ये हिस्सेदार बनवून कायदेशीर प्रमाणे मालक बनवावे.


अशी जनवादी महिला संघटनेची मागणी असून, त्यांना लवकरात लवकर समज देऊन कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा कारवाई न केल्यास आपल्या कार्यालय वरती जनवादी महिला संघटनेचा वतीने मोर्चा आयोजित करण्यात येईल. असे सूत्राकडून समजले आहे.

तसेच या प्रकरणात पालघर पोलीस काही कारवाई करू शकते का? असं प्रश्न नागरिकांमध्ये होत आहे. त्याचं प्रमाणे पालघर पोलिसांकडे हे मोठे आव्हान आहे. का पालघर पोलीस जसं नेहमी प्रमाणे या प्रकरणात सुद्धा दुर्लक्ष करेल आणि आरोपी मोकाट जनावरे सारखे फिरत बसेल असा सवाल होत आहे.

Leave a Comment