दिनांक 28/01/2022
केंद्रीय मंत्री मा. श्री. कपिल पाटील यांनी बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आमदार श्री. हितेंद्र ठाकूर यांची विरार येथील कार्यालयात येवून सदिच्छा भेट घेतली. सरपंच ते केंद्रीय मंत्री अशी वाटचाल असलेल्या श्री. कपिल पाटील आणि श्री. हितेंद्र ठाकूर यांची मैत्री ठाणे -पालघर जिल्ह्यामध्ये सर्वश्रृत आहे. ठाणे जिल्हा परिषद व ठाणे जिल्हा बॅंकेवर दोघांनी अनेक वर्ष एकत्रित वर्चस्व गाजवले आहे. विविध राजकीय नेत्यांबरोबर श्री. हितेंद्र ठाकूर यांनी पक्षापलीकडे जावून मैत्रीचे संबंध जोपासले आहेत आणि त्यातुन वसई चा विकास साधत आले आहेत. काही महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री मा. श्री. नारायण राणे यांनी देखील त्यांचा पक्षीय दौरा बाजुला ठेवून श्री. हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती. आॅगस्ट 2021 मध्ये पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील समस्या घेवून बहुजन विकास आघाडीचे शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री श्री. कपिल पाटील यांची भेट घेतली होती, त्याअनुशंगाने आज केंद्रीय मंत्री महोदयांनी बहुजन विकास आघाडीच्या विरार येथील मुख्यालयाला भेट दिली. जवळपास 2 तास पालघर जिल्ह्यातील विविध समस्यांबाबत प्रदिर्घ चर्चा झाली आणि त्यासंदर्भात ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले. सदर चर्चेमध्ये आमदार श्री. राजेश पाटील, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र पाटील, प्रथम महापौर श्री. राजीव पाटील, जि.प. ठाणे माजी अध्यक्ष श्री. बबनशेठ नाईक आणि श्री. काशिनाथ पाटील, माजी महापौर श्री. नारायण मानकर, श्री. रूपेश जाधव आणि श्री. प्रविण शेट्टी, उपमहापौर श्री. उमेश नाईक, जिल्हा बॅंकेचे संचालक श्री. प्रशांत पाटील, श्री. योगेश पाटील, माजी सभापती श्री. पंकज ठाकूर, श्री महेश पाटील,श्री. प्रफुल्ल साने, श्री. भरत गुप्ता आणि श्री. यज्ञेश्वर पाटील,मा. महिला बालकल्याण समिती सभापती सौ. माया चौधरी हे सहभागी होते.