भरत गवारी,जव्हार
दि.१४ फेब्रुवारी २०२२.
गुरुगोविंद सिंग फाउंडेशन अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल नाशिक आणि भारती विद्यापीठ प्रशाला व ज्युनिअर कॉलेज जव्हार यांच्या संयुक्त विद्यमाने सामान्य वैद्यकीय तपासणी शिबिर व वैद्यकीय मार्गदर्शन भारती विद्यापीठ जव्हार प्रांगणात आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पद्मा रजपूत नगराध्यक्ष जव्हार नगर परिषद ,आयुषी सिंह सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी जव्हार उपस्थित होत्या. या आगळ्या-वेगळ्या स्तुत्य उपक्रमास उपस्थित मान्यवर यांनी शुभेच्छा दिल्या. सदर वैद्यकीय तपासणी शिबिरात पालक ,ग्रामस्थ ,विद्यार्थ्यांनी जवळपास ४३० व्यक्तींची मोफत तपासणी करून त्यांना योग्य औषधोपचार करण्यात आले. तसेच गुरुगोबींद सिंग फाउंडेशन तर्फे इयत्ता १० व १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय मार्गदर्शन शिबिर आयोजित करून विद्यार्थ्यांना भविष्याच्या वाटा याविषयी मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले .
या कार्यक्रमाला बलबीर सिंग छाब्रा, चेअरमन गुरुगोविंद सिंग फाउंडेशन नाशिक परमिंदूर सिंग कार्यकारी संचालक गुरूगोविंद सिंग फाऊंडेशन नाशिक,कुलजित सिंग बिद्री ,
सेक्रेटरी गुरू गोविंदसिंग फाऊंडेशन नाशिक डॉ.अभय वालिया डॉ. अमरजीतसिंग गुजराल, डॉ. अतुल जयेकर ,डॉ. विश्वनाथ साळवे, डॉ. प्रियंका भावसार सदर कार्यक्रमाचे संयोजन प्राचार्य व्ही. जे. कनुंजे भारती विद्यापीठ प्रशाला व ज्युनियर कॉलेज जव्हार , राम डोके मुख्याध्यापक भारती विद्यापीठ इंग्रजी माध्यम स्कुल, जरग डी. बी. मुख्याध्यापक भारती विद्यापीठ प्राथमिक आश्रम शाळा जव्हार ,व इतर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पालक वर्ग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.