पुण्यातील शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
कुचिक यांच्या विरोधात 24 वर्षीय तरुणीने तक्रार दाखल करण्यात आली आहे. तरुणीने कुचिक यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप लावले आहेत. तरुणी गर्भवती राहिल्यानंतर तिला जबरदस्तीने गर्भपात करायला भाग पाडले. अन्यथा जीवे मारण्याचीही धमकी देण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुचिक यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
24 वर्षीय तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. तक्रारीनुसार ही घटना 6 नोव्हेंबर 2020 ते 10 फेब्रुवारी 2022 दरम्यानची आहे. तरुणीवर अत्याचार पुणे, गोवा सारख्या वेगवेगळ्या ठिकाणी झाला असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
रघुनाथ कुचिक यांनी लग्नाचे आमिष देऊन शारीरिक संबंध ठेवले, त्यानंतर तरुणी गर्भवती राहिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. परंतू नंतर गर्भपात करण्यासाठी तरुणीवर दबाव टाकण्यात आला आणि तिला जीवे मारण्याचीही धमकी देण्यात आली.