Palghar Nargrik

Breaking news

विक्रमगड माण आश्रमशाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या……..

विक्रमगड माण आश्रमशाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या
—–परिसरात खळबळ. विक्रमगड पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद.

जव्हार पाथर्डीतील अल्पवयीन विद्यार्थ्यांची आत्महत्या

विद्यार्थ्यांची आत्महत्या कि,खून प्रकरण गुलदस्त्यात

भरत गवारी,जव्हार
दि.२१ फेब्रुवारी २०२२.
जव्हार तालुक्यातील पाथर्डी गावचे रहिवासी काशिनाथ किसन बुधर. वय-४६ यांचा मुलगा अभिमन्यू काशिनाथ बुधर. वय- १६ हा विक्रमगड येथील माण अनुदानित माध्यमिक आश्रमशाळेत दहावीत शिकत होता.त्याचा अचानक पणे माण आश्रमशाळेच्या मागील झाडाला रविवारी सकाळच्या वेळेला गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेला मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ परिसरात उडाली होती.ह्या घटनेमुळे जव्हारचे एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय पुन्हा चर्चेत आले आहे.आधीच प्रकल्प कार्यालयातील शिक्षण विभागातील गोंधळ,आश्रम शाळेतील काही शिक्षकांचे थकलेले पगार,धरणे आंदोलने,आदिवासी विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हे प्रकार चालुच असल्याने प्रकल्प कार्यालयाला आदिवासी विद्यार्थ्यांच्या आत्महत्येंचे ग्रहण चालुच राहिलेले आहे.हे जव्हार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शिक्षण विभागाचे यश कि,अपयश म्हणावे हेच कळत नाही.मयत अभिमन्यू याची आत्महत्या कि,खून ? याचा अद्याप अजून उलगडा झालेला नाही.त्यामुळे मृत्यूचे नेमके खरे कारण समजू शकले नसल्याने मृत्यूचे गूढ वाढले आहे. सबंधित तपास यंञणेने,वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत विद्यार्थ्यांचा मृत्यू गळफास घेतल्यानंतर हि आकस्मिक झाल्याचे चिञ समाजात उभे केल्याने मृत्यूचा तपास संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यातुन पोलीस तपास यंञणेकडून हि घटना दाबण्याचा प्रयत्न केला असल्याचे चव्हाट्यावर आले आहे.अशा आरोप मयत अभिमन्यूच्या नातेवाईकांकडून केला जात आहे.
अभिमन्यू हा दोन दिवसांआधी गावातील लग्न कार्यासाठी पाथर्डी येथे आला होता.परंतु शाळेला सुट्टी नसल्याने तो लगेचच माण आश्रमशाळेत गेला होता.परंतु रविवारी त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत माण आश्रम शाळेच्या परिसरात झाडाला लटकलेला सापडला आहे. हि घटना घडताच माण आश्रम शाळेतील शालेय प्रशासनाने हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आदिवासी समाजाकडून केला आहे. हि घटना घडताच विक्रमगड पोलिसांनी मयत विद्यार्थ्यांच्या मृत्यूचा पंचनामा करुन मयत अभिमन्यू काशिनाथ बुधर. वय-१६ याचा मृतदेह विक्रमगडच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. तेथील सबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचा मृत्यू आकस्मिक दाखवल्याचे भासविल्याने संशय अजून बळावला आहे. विद्यार्थ्यांने गळफास घेतला असताना हि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत्यूची नोंद आकस्मिक कशी दाखवली आहे ? अशा प्रश्न उपस्थित झाल्याने शवविच्छेदन करणाऱ्या डाँक्टरांनी हे प्रकरण दाबण्यासाठी खोटा अहवाल दिल्याचा आरोप जव्हार मनसे शहर अध्यक्ष गोपाळ वझरे यांनी केला आहे. ह्या प्रकरणातील सबंधित दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आदिवासी संघटनांनी केली आहे.


मयत अभिमन्यू च्या मृत्यूचा पंचनामा पोलीस नाईक /०६ गणेश नामदेव धोडी यांनी केला असून विद्यार्थ्यांचा गळफास घेऊन मृत्यू झालेला असताना ही विक्रमगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद क्रमांक- ०६/२०२२ क्रि.पो.को.कलम १७४ नुसार केली आहे.सबंधित यंञणेची तपासाची दिशा संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याने सबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जव्हार मनसे शहर अध्यक्ष गोपाळ वझरे यांनी केली आहे.या घटनेविषयी विक्रमगड पोलिस स्टेशनच्या भ्रमणध्वनींवर पञकारांनी संंपर्क साधला असता रिंग वाजत असुन हि काँल उचलले जात नव्हते. मात्र योगायोगाने काँल उचलल्या नंतर ह्या प्रकरणाची माहिती विचारल्यावर कार्यालयातील व्यक्तीने मी बाहेर असुन ह्या प्रकरणाचा अधिक तपास दुसऱ्याकडे असुन तुम्हांला नंतर सविस्तर माहिती पाठवितो.असे पञकारांना सांगण्यात येत होते.परंतु पञकारांना त्यांनी प्रकरणाची कुठलीच माहिती न पाठविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.त्यामुळे प्रकरणाच्या तपासाची दिशा संशयात सापडल्याचे चित्र समोर येत आहे.ह्या प्रकरणाची अधिक चौकशी विक्रमगडचे पोलिस निरीक्षक प्रदिप गीते करीत आहेत.

“आदिवासी विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी करुन विद्यार्थ्यांच्या पालकाला न्याय मिळवुन देऊन खोटा आकस्मिक मृत्यूचा अहवाल देणाऱ्या सबंधित अधिकाऱ्यांना वर कारवाई करावी,अशी मागणी आहे.”

—- गोपाळ वझरे, मनसे जव्हार शहराध्यक्ष.

“माझ्या मुलाच्या आत्महत्येची चौकशी करुन सबंधित दोषींना कारवाई करावी.हि अपेक्षा आहे”.

Leave a Comment