विक्रमगड नगर पंचायतीवर जिजाऊचा झेंडा
विक्रमगड मध्ये,मिरवणुकीत जिजाऊ कार्यकर्त्यांचा जल्लोष
—-निलेश सांबरेची उपस्थिती ,मिरवणुकीत डि.जे वर धरला ठेका.
प्रतिनिधि पालघर नागरिक भरत गवारी,जव्हार
दि.२३ फेब्रुवारी२०२२.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या विक्रमगड नगर पंचायतीच्या निवडणुकीत विक्रमगडच्या जनतेने जिजाऊला कौल दिल्याने एक हाती सत्ता स्थापन झाली आहे. विक्रमगड नगर पंचायत निवडणुकीत जिजाऊने उभे केलेले सर्व उमेदवार निवडून आले होते.माञ नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदी कोणाची वर्णी लागणार ? ह्या प्रश्नाविषयी विक्रमगडच्या जनतेते कुतूहल होते.
मात्र बुधवारी नगराध्यपदी निलेश(पिंका) रमेश पडवळे व उपनगराध्यक्ष पदी महेंद्र तुकाराम पाटील ह्या दोघांची हि बिनविरोध निवड झाली आहे.त्यानिमित्त विक्रमगड शहरात जिजाऊंच्या कार्यकर्त्यांसोबत भव्य मिरवणूक काढण्यात आली.ह्या मिरवणूकीत जव्हार,मोखाडा,विक्रमगड मधील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.त्यामुळे मिरवणुकीत जल्लोषाचे वातावरण पाहावयास मिळत होते.
ह्या काढलेल्या मिरवणुकीत निलेश सांबरे हि सामिल झाले होते.त्यांनी जिजाऊच्या कार्यकर्त्यांसोबत डि.जे. वर ठेका धरला.त्यामुळे कार्यकर्त्यांचा मिरवणुकीत जोश वाढला होता.यावेळी जिजाऊ चे संस्थापक निलेश सांबरेंशी आमच्या दैनिक. महानगरी टाईम्सच्या जव्हार प्रतिनिधींनी खास संपर्क साधला असता ते म्हणाले कि,विक्रमगड शहरातील पाणीपुरवठा योजना जनतेच्या घरापर्यंत पोहचविल्या जातील,शहरातील रस्त्यांची विविध कामे,विकास कामे,अतिक्रमणे हटवली जातील.यासारख्या पायाभूत सोयी सुविंधाची विकास कामे करणार असल्याचा मनोदय व्यक्त केला.त्यामुळे विक्रमगडच्या विकासासाठी भर पडणार आहे.या मिरवणुकी प्रसंगी पालघर जिल्हा उपाध्यक्ष शिवा सांबरे, हबिब शेख,प्रफुल्ल पवार, गणेश रजपूत, दिपक कांगणे,अशोक चौधरी, संकेत माळगावी, याशिवाय जिजाऊचे शेकडो कार्यकर्ते ,पदाधिकारी यावेळी मिरवणुकीत सहभागी झाले होते.