Palghar Nargrik

Breaking news

आधार नोंदणीत ठरला पालघर जिल्हा सर्वोत्कृष्ट/ उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्र्यांच्या यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान……

कोवीड 19 च्या महामारीच्या काळात आधार नोंदणी साठी प्रकल्पात एकच आधार नोदणी संच उपलब्ध असताना देखील अंगणवाडी सेविकांनी त्यावेळेस 6 हजार 500 बालकांची आधार नोंदणी करू राज्यात एक आदर्श निर्माण केल्याबद्दल सर्वोत्कृष्ट जिल्हा म्हणून पालघर जिल्हा परिषदेस महिला दिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात गौरविण्यात आले.

उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर, रूपाली चाकणकर अध्यक्ष राज्य महिला आयोग, रुबल अग्रवाल आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढाण आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ सर्वात जास्त आधार नोंदणी करणाऱ्या अंगणवाडी सेविका शीतल पाटील आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास प्रवीण भावसार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

महामारीच्या काळात अंगणवाडी सेविका घरोघरी फिरून घरात कुणी आजारी आहे की नाही त्याची खातरजमा करत होते त्यावेळेसच आपल्या घरी आधार कार्ड काढण्यात आले आहे की नाही याची विचारणा करून ज्यांनी आधार कार्ड काढले नाही त्यांना आधार कार्ड काढण्याने होणाऱ्या फायद्याची माहिती उपलब्ध करून दिली व त्यांना आधार कार्ड काढण्यासाठी प्रवृत्त केले वेळप्रसंगी त्यांना आधार केंद्रावर घेऊन जाऊन आधार कार्ड काढून देण्यात सुद्धा मोलाचे कार्य केले या पद्धतीने संपूर्ण जिल्ह्यात महामारीसारख्या संकटात असतानासुद्धा अंगणवाडी सेविकांनी मोलाचे योगदान दिल्याने महामारीच्या च्या काळात सुद्धा 6 हजार 500 आधार कार्ड काढून पालघर जिल्हा बालकांची आधार नोंदणी करण्यामध्ये राज्यात अवल नंबर ठरला आहे.

कोणत्याही प्रकारची परिस्थिती असो अंगणवाडी सेविका आपल्या कामापासून कधीच मागे हटत नाहीत कोवीड महामारीच्या काळात त्यांनी आपली काळजी न करता बाल आधार नोंदणीचे जे काम केले आहे ते कौतुकास्पद आहे. हा पुरस्कार म्हणजे त्यांनी केलेल्या कार्याची पावती आहे. असे मत जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढाण यांनी व्यक्त केले आहे.

तर एकात्मिक बाल विकास प्रकल्प अंतर्गत आमच्या अंगणवाडीच्या सेविकांनी आधार कार्ड चे नियोजन करायचे होते त्याच्यात त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. जिल्ह्यामध्ये अजूनही वेगवेगळे कार्यक्रम सुरू आहेत आजचा पुरस्कार एकत्रित काम करण्याचे फलित आहे व त्याची दखल राज्य शासनाकडून घेण्यात आली आहे यापुढेही पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्रित पद्धतीने काम करू व त्यात प्रत्येकाचे योगदान असेल.असे सांगून मु.का.अ.सालीमठ यांनी अंगणवाडी सेविकांचे कौतूक केले.

सर्वाधिक नोंदणी करणाऱ्या पुरस्कारास प्राप्त ठरलेल्या शीतल अरुण पाटील यांनी जिल्हा मु.का.अ.सिद्धाराम सालीमठ , महिला व बाल विकास अधिकारी प्रवीण भावसार तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने मुळे च व माझ्या सहकारी अंगणवाडी सेविका यांच्या सहकार्या मुळेच हे यश प्राप्त करू शकले अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

Leave a Comment