राष्ट्रीय अनुसुचित जमाती आयोग’ ‘भारत सरकार’ नवी दिल्लीचे चार संशोधन इंटर्न सुदाम उंबरसाडा, योगेश निकुळे, संकेत गडग, नरेंद्र बोरसे यांच्या द्वारे विविध सरकारी विभागांद्वारे त्यांच्या कला, संस्कृती आणि परंपरा यांचे संरक्षण,
कल्याण आणि देखभालीसाठी चालवल्या जाणाऱ्या योजनांचे संशोधन केले जात आहे. सदर आदेश जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालय पालघर यांनी केला.
या दौऱ्यात चार इंटर्नांनी नायब तहशीलदार सौ. श्री. दिपक गडग साहेब यांची भेट घेऊन राबविण्यात येणाच्या योजनांबाबत आणि कागदपत्रांविषयी चर्चा केली. ज्यामध्ये नायब तहसीलदार यांनी राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती व लाभार्थ्यांची माहिती दिली.
कार्यालयातील अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी भेट देणार आहेत. ज्यामध्ये लोकांशी चर्चा करणार आहेत की योजनांचा लाभ मिळत आहे की नाही? यानंतर अहवाल तयार करून राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाला सादर केला जाईल. अधिकाऱ्यांशी संवाद साधताना अनुसूचित जमातींबाबत सुचनाहीं दिल्या जात असत असल्याचे त्यांनी सांगितले . त्यांनी सांगितले की या चार यापूर्वी अनेक सरकारी विभागांना भेटी दिल्या आहेत. आता आम्ही प्रखंड स्तरावरील कार्यालयांना भेट देऊ.