Palghar Nargrik

Breaking news

तत्कालीन पोलीस आयुक्तांसाठी 200 कोटींची वसुली? ‘लेटरबॉम्बने’ पोलीस दलात खळबळ…..

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात सध्या एका पत्राने चांगलीच खळबळ उडवली आहे. पिंपरी चिंचवडचे तत्कालीन आयुक्त कृष्णप्रकाश (IPS Krishna Prakash) यांच्यासाठी जमीन व्यवहारातून तब्बल 200 कोटी रुपये जमा करण्यात आल्याचा दावा या बनावट पत्रात करण्यात आला आहे.

कृष्णप्रकाश यांच्या काळात त्यांचे रीडर आणि सामाजिक सुरक्षा पथकात कार्यरत असणारे सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक डोंगरे यांच्या नावे मुख्यमंत्र्यांना पाठवलेले हे सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. या कथित पत्रानुसार डोंगरे यांनी जीवाला धोका असल्याचा दावा करत कृष्णप्रकाश यांच्या जमिनीच्या व्यवहाराचे पैसे गोळा करावे लागत असल्याचा दावा केला आहे.

ही रक्कम 200 कोटींची असल्याचा दावा या कथित बनावट पत्रात करण्यात आला आहे. इतकंच नाही तर अनेक पत्रकारांना ही कृष्णप्रकाश यांनी पैसे पुरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्या बदल्यात कृष्णप्रकाश यांची प्रतिमा संवर्धनाचे काम पत्रकार करत होते असंही या व्हायरल पत्रात सांगण्यात आलंय आहे.

 

 

 

कृष्णप्रकाश यांच्या वाढदिवसानिमित्त वर्तमानपत्रात त्यांची कौतुक पुरवणी काढण्यात आली होती त्याचे ही पैसे दुसऱ्याने दिल्याचा दावा पत्रात करण्यात आला आहे. या व्हायरल झालेल्या कथित फेक पत्राने शहरात मात्र खळबळ उडवून दिली आहे.

Leave a Comment