Palghar Nargrik

Breaking news

भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), पालघर तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काळे झेंडे, फित दाखऊन जाहीर निषेध …..

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून पालघर जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर वाढती महागाई, बेरोजगारी, स्थानिक आदिवासी बांधवांचे वनदाव्याचे प्रलंबित प्रश्न, पाणी आणि (NH 48) मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील ठेकेदार ( NHAI ) हे चालवीत असलेल्या टोलनाक्याची मुदत संपली असताना देखिल संबंधित ठेकेदाराकडून बेकायदेशीर चालू असलेली कर वसुली ताबडतोब थांबवावी व टोल मुक्त करण्यात येण्यासाठी काळ्या फिती, झेंडे दाखऊन निदर्शने देत पक्षाच्या माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आलेला असून त्यावेळीं उपस्थित माकप तालुका कमिटीमार्फत जिल्हाधिकारी यांस निवेदन देऊन चर्चा करण्यात आली त्यावेळेस कॉ. सुनिल सुर्वे आणि कॉ. हर्षल लोखंडे यांनी मुंबई – अहमदाबाद मार्गावर चालू असलेला बेकायदेशीर टोल वसुलीबाबत चर्चा केली आणि महामार्ग अभ्यासू हर्बनसिंग नन्नड यांनी महामार्गावरील ब्लॅकस्पॉटचा विषय निदर्शनात आणून देत होणारे अपघात यावर चर्चा केली. त्यावेळेस कॉ. हर्षल लोखंडे यांनी इशारा दिला की 07 दिवसात टोल वसुली बंद झाली नाही तर पक्षाच्या माध्यमातून ठोक कारवाई करण्यात येईल व त्या वेळेस कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ठेकेदार, शासन, प्रशासन जबाबदार राहतील.तसेच पिण्याचे पाणी, बेरोजगारी, शिक्षण, वन दाव्याचे प्रश्न व इतर विषयांवर देखिल चर्चा करण्यात आलेली असुन जिल्हाधिकारी माणिक गुरसल याबाबत शिष्ट मंडळाला बोलाऊन चर्चा करणार असे आश्वासन देण्यात आलेले आहे.
तरी यावेळेस माकप तालुका सचिव कॉ.सुनिल सुर्वे, कॉ. हर्षल लोखंडे, महामार्ग अभ्यासू हर्बनसिंग नन्नड, मानव अधिकार मिशनचे महाराष्ट्र सचिव मैनुद्दीन खान, कॉ. चेतन शेलार व इतर कार्यकर्ते उपस्थित होते…..

 

Leave a Comment