डहाणू. (प्रतिनिधी) – चारोटी टोल प्लाझा वर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन घेणार असल्याचे लाल बावटा ठाणे जिल्हा वाहतूक चालक मालक, संघटना चे डहाणू तालुका चालक मालक संघटना अध्यक्ष कॉ. चंद्रकांत घोरखना यांना इशारा दिला आहे.
यावेळी कॉ. घोरखना म्हणाले की, चारोटी टोल प्लाझा येथे पुर्वी आय. आर. बी. (IRB) हि कंपनी कार्यरत होती. व त्या कंपनीने स्थानिक लोकांना व स्थानिक मशनरीमध्ये विविध प्रकारचा रोजगार उपलब्ध करून दिला होता. व तसेच त्या कंपनीचा करार दि. 26/06/2022 रोजी संपला असून, रोडलिंक इन्फ्राटेक ह्या कंपनीने नवीन करार केला. तेव्हापासून स्थानिक लोकांचा मशनरीचा रोजगार गेला असून, व तसेच रस्त्याची देखभाल दुरूस्ती याचावर दुर्लक्ष केले असून, ठीकठिकाणी खड्डे व खड्ड्यामध्ये पाणी साचल्यास चालक मालकांना रोडवरती गाडी चालविताना नाहक त्रास होत असल्यास व तसेच त्या खड्यांमुळे अपघात वाढले. त्यामुळे स्थानिक हॉस्पिटल किंवा सरकारी रुग्णालयातून एखादा पेशंट मुंबईकडे नेल्यास रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे पेशंटचा जीव जात आहे. तसेच डहाणू तालुकयामध्ये आरटीओ व महामंडळ या दोघांनी संगनमत करून, आमच्या चालक – मालकांना जाणून बुजून नाहक त्रास दिला जात आहे. व तसेच या भागामध्ये काही कंपनी नसल्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा रोजगार मिळत नसल्याने काही गरीब शेतकरी व मध्यम वर्गाच्या लोकांनी लोन काढून गाड्या घेतलेल्या आहेत. ते लोन भरता – भरता सर्व चालकांना काटकसर करून परिवारांचा उदरनिर्वाह करीत असून, महामंडळाचे काही लोक स्थानिक पोलिस स्टेशनचा काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून मोठ्या रक्कमेची पावती फाडण्याचे काम चालू आहे. म्हणून आम्हा सर्व चालक – मालकांवरती उपासमारीची वेळ आली आहे. व तसेच या संबंधित डहाणू विधानसभेचे आमदार कॉ. विनोद निकोले यांनी आपल्या कार्यालयात दि. 15/07/2022 रोजी पत्र दिले होते. परंतु ह्या पत्राचा संबंधित आमदारांना व तसेच मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचा ऑफिसमध्ये कुठल्याही प्रकारचे उत्तर मिळाले नाही. म्हणून आम्ही डहाणू विधानसभेचे आमदार यांच्या व मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचा नेतृत्वाखाली आम्ही चारोटी टोल प्लाझा येथे दि. 29/07/2022 रोजी टोल फ्री करून जेल भरो आंदोलन करणार आहे. व तसेच संबंधित अधिकारी 1. आरटीओ 2. महामंडळ यांना त्या ठिकाणी उपस्थित ठेवावे. या आंदोलनामध्ये कायदा व सुव्यव्यवस्था बिघडल्यास त्या कंपनीचे मॅनेजमेंट जबाबदार राहतील, असा जोरदार इशारा लाल बावटा ठाणे जिल्हा वाहतूक चालक मालक, संघटना चे डहाणू तालुका चालक मालक संघटना अध्यक्ष कॉ. चंद्रकांत घोरखना यांना दिला आहे.