डहाणू. – लाल बावटा ठाणे जिल्हा वाहतूक चालक मालक, संघटना चे डहाणू तालुका चालक मालक संघटना वतीने तथा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 128 डहाणू (अ. ज.) विधानसभा आमदार कॉ. विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली स्थानिकांच्या मागण्यांसाठी घेण्यात आलेले आंदोलन यशस्वी झाले आहे.
याप्रसंगी आरटीओ अधिकारी, परिवहन विभागाचे अधिकारी, टोल प्लाझा चे संबंधित अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्या समवेत आंदोलकांसोबत सार्वजनिक चर्चा करून 1) स्थानिक चालक मालका कडून पैसे वसुली करणे बंद करा. 2) स्थानिक लोकांना रोजगार मिळालाच पाहिजे. 3) रस्त्यावरचे खड्डे त्वरीत बुजवावेत. 4) रस्त्यावर अपघात झाल्यास त्वरीत रुग्णवाहिका उपलब्ध करुन देणे. या प्रमुख मागण्या आमदार कॉ. विनोद निकोले यांच्या उपस्थितीत सोडविण्यात आल्या.
दरम्यान आमदार कॉ. विनोद निकोले म्हणाले की, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा गोरगरीब जनतेचा पक्ष आहे. सामान्य नागरिकांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन उभारून न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण शक्तीने पूर्ण प्रयत्न करणार पक्ष आहे.
याप्रसंगी आमदार कॉ. विनोद निकोले, डहाणू तालुका चालक मालक संघटना अध्यक्ष कॉ. चंद्रकांत घोरखाना, प्रदीप दवणे, त्रिबंक लहांगे, रतन भोसले, जनवादी महिला संघटनेचे कॉ. लता घोरखाना, सुमित्रा बरफ, रुपा राठोड, सिटूचे सुरेश जाधव, माकप पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.