Palghar Nargrik

Breaking news

महाराष्ट्रातून गुजराती बाजुला केले तर…’; राज्यपाल यांच्या वक्तव्यामुळे संजय राऊत भडकले, CM शिंदे यांना थेट सवाल……

Maharashtra : Governor’s Controversial Statement :शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमादरम्यान केलेल्या टिप्पणीवर टीका केली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट सवाल केला आहे. त्यांनी कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानावर संजय राऊतांनी टीकास्त्र सोडले आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान करताना म्हटलेय, जर गुजराती आणि राजस्थानी नसते तर मुंबईचे आर्थिक महत्व कसे निर्माण झाले असते. यावरुन आता राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्यपालांच्या या विधानावरुन संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.

राऊत यांनी या विधानाचा अर्थ राज्यातील मराठी लोकांवर हल्ला असा केला. यावर त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाब विचारला. मुख्यमंत्री तुम्ही ऐकतायना, असे त्यांनी ट्विट केलेय आहे. संजय राऊत यांनी टि्वटरवर भाषणाचा व्हिडिओच शेअर करत लिहिले की, “महाराष्ट्रात भाजप पुरस्कृत मुख्यमंत्र्यांनी मराठी माणसाचा आणि शिवरायांचा अपमान करायला सुरुवात केली आहे. स्वाभिमान अभिमान यावर बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल तर शिवसेनेचे नाव घेऊ नका..मुख्यमंत्री शिंदे..राज्यपालांचा साधा निषेध तरी करा. मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे.

महाराष्ट्राचा घोर अपमान झाल्याची टीका त्यांनी केलीय. 50 खोकेवाले आता कोणत्या झाडी डोंगरात लपून बसलेत, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांच्यात स्वाभिमानाचा अंश असेल तर त्यांनी राज्यपालांचा राजीनामा मागावा, असं आव्हान त्यांनी दिले आहे.

राज्यपाल नेमके काय म्हणाले?
अंधेरीत राज्यपाल म्हणाले, “मी लोकांना कधी-कधी सांगत असतो की जर गुजराती आणि राजस्थानींना महाराष्ट्रातून, विशेषत: मुंबई आणि ठाण्यातून बाजुला केले, तर तुमच्याकडे पैसे उरणार नाहीत.”

मुंबईतून गुजराती, राजस्थानी वगळले तर मुंबईकडे काय राहिल ? मुंबई आर्थिक राजधानी कशी राहिल ? असं वक्तव्य कोश्यारींनी केले आहे. गुजराती लोक मुंबईतून गेले तर पैसे राहणार नाहीत, तसेच आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे ती राहणार नाही, असं वक्तव्य राज्यपालांनी केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे.
राष्ट्रवादीकडून राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध
खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न राज्यपाल भगतसिंह कोश्यारी करत आहेत,असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. राज्यपालांची तक्रार करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वाट न पाहता ट्विटरवरून आत्ताच्या आताच्या आता पंतप्रधानांकडे पत्र लिहून तक्रार करावी, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Leave a Comment