Palghar Nargrik

Breaking news

संजय राऊतांच्या अडचणीत आणखी वाढ; ………

स्वप्ना पाटकरांना धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल
[स्वप्ना पाटकर यांना धमकावल्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकोला पोलीस ठाण्याच राऊतांवर गुन्हा दाखल झाला.

स्वप्ना पाटकर यांनी धमकावल्याची तक्रार केली होती. त्यावर शनिवारी राऊतांवर एनसी दाखल करण्यात आली होती. मात्र किरीट सोमय्या यांनी काल पोलीस ठाण्यात धाव घेऊन एफआयआर दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर राऊतांवर 504 आणि 509 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आली.

शिवसेना खासदार संजय राऊत यांना अखेर ईडीने अटक केली आहे. रविवारी अंमलबजावणी संचलनालय (Enforcement Directorate) ताब्यात घेतलं होतं. रविवारी सकाळीच ईडीचं पथक संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी पोहोचलं होतं. साडे नऊ तास चौकशी केल्यानंतर ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतलं आणि त्यांना ईडी कार्यालयात घेऊन आले होते. (Shiv Sena MP Sanjay Raut arrested by ED in land scam case)

संजय राऊत यांना आता सोमवारी सकाळी जे.जे रुग्णालयात तपासणीसाठी नेलं जाणार आहे. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. आज संजय राऊत यांच्या निवासस्थानी ईडीला 11 लाख 50 हजार रुपये मिळाल्याची देखील माहिती आहे.

याआधी संजय राऊत यांना ED ने चौकशीसाठी तीन वेळा समन्स बजावला होता. मात्र ते हजर राहिले नव्हते. त्यानंतर रविवारी सकाळी ED अधिकारी थेट त्यांच्या घरी पोहोचले होते. दुपारी ताब्यात घेतल्यानंतर जवळपास 8 तासानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.

Leave a Comment