Palghar Nargrik

Breaking news

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘हा’ दौरा वादात, तीन ठिकाणी तक्रार दाखल…….

Eknath Shinde’s visit to Sambhajinagar controversy : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संभाजीनगर दौरा वादात सापडला आहे. दौऱ्यात मध्यरात्री ढोलताशे, भाषणबाजी ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचं उल्लंघन करणारी झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यात सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचं उल्लंघन केले, असा आरोप काही संघटनांनी केला आहे. याबाबत संघटनांकडून तीन ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रात्रीपर्यंतची भाषणबाजी, ढोलताशांविरोधात या संघटनांनी आणि नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संभाजीनगर दौऱ्यात त्यांनी उशिरापर्यंत कार्यक्रम घेतले. भाषणही केले. रात्री दहापर्यंत सर्वोच्च न्यायालयाची आवाज मर्यादा असते त्यानंतर उल्लंघन असतं. मात्र तरीसुद्धा ढोल सुरु होते, भाषण सुरु होते पहाटे तीन वाजेपर्यंत हा सगळा प्रकार सुरु होता. याच विरोधात आता काही संघटनांनी औरंगाबादच्या क्रांती चौक पोलीस, वेदांत नगर पोलीस ठाण्यात आणि अजूनही काही ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे. यात सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनीच केलं, असे तक्रार अर्जात म्हटले आहे. या तक्रार अर्जानुसार तीन ठिकाणी तक्रार नोंदविण्यात आली आहे. या तक्रारींवर मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

Leave a Comment