शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत राज्याचे डोळे लागून होते. विरोधकांकडूनही वारंवार यांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. परंतू आता यासंबधी मोठी अपडेट समोर येत असून उद्या सकाळी 11 वाजता राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार होणार असून, शपथविधीदेखील होणार आहे. राजभवनावर सकाळी हा शपथविधी होणार आहे..
मंत्रिमंडळ विस्तारानंतर 10 ते 17 ऑगस्ट राज्याचे विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन बोलवण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय.
ज्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. त्यांना आज सायंकाळपर्यंत मुंबईत येण्याचे निरोप मिळणार आहे.
शिंदे-फडणवीस सरकारचे संभाव्य मंत्रिमंडळ
भाजप
देवेंद्र फडणवीस
चंद्रकांत पाटील –
जयकुमार रावल
राधाकृष्ण विखे पाटील
प्रविण दरेकर
रविंद्र चव्हाण
नितेश राणे
शिंदे गटातील संभाव्य मंत्री
गुलाबराव पाटील
दिपक केसरकर
दादा भुसे
अब्दुल सत्तार
शंभुराज देसाई
संजय शिरसाठ
संदिपान भुमरे