बोईसर:- राज्यात सोमवारी अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.पालघर, बोईसर,डहाणू,या ठिकाणी पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. असचं महावितरणचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.विनापरवाना खोदकाम, उघड्या केबल, वीजतारा तुटणे, पोल वाकणे, शॉर्टसर्किट होणे यामुळे निष्पापांचे हकनाक बळी जातात.
बोईसर कोलवडे नाका एका व्यक्तिच्या डोक्यात विजेचा खांब कोसळल्याची घटना घडली आहे.या घटनेत सदर व्यक्ति गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या तुंगा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. योगेश पागधरे असे जखमी व्यक्तिचे नाव आहे. हे खांब जीर्ण झाले होते असे सूत्राकडून समजले मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते. काही वेळाने याच रस्त्यावरुन ही व्यक्ति जात असताना त्याच्या डोक्यावर तो खांब पडला. यात डोक्याला अंतर्गत इजा झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बोईसर तारापूर MIDC मध्ये वारंवार होणाऱ्या दुर्घटनेला जबाबदार MSEB अधिकारी, लाईनमन हे आहेत. MSEB हलगर्जीपणामुळे आज कामासाठी बाहेर पडलेल्या पागधरे यांच्या जीवितास धोका निर्माण झालं असता.परिणामी थोड्याशा सोसाट्याच्या वाऱ्याने तारा एकमेकांना घासल्यास वीजपुरवठा खंडित होतो; तसेच वारा जास्त वेगाने आल्यास खांब वाकतात. कित्येक ठिकाणी विद्युत खांबाचे ताण गायब झालेले आहेत, मात्र वीज वितरण कंपनीने हे ताण पुन्हा बसविण्याची तसदी घेतली नाही. वास्तविक पाहता पावसाळा लागण्यापूर्वी प्रत्येक विद्युत उपकेंद्रांतर्गत येणाऱ्यी क्षेत्रात तारा, खांब याचा आढावा घेऊन आवश्यक त्या ठिकाणी तारा बदलणे, झुकलेले खांब सरळ करणे, ताण देणे, लोंबकळलेल्या तारा सरळ करणे, तुटलेल्या तारा जोडणे, झाडांच्या फांद्या छाटणे ही कामे प्राधान्याने करणे गरजेचे आहे. याकडे महावितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी दुर्लक्ष करीत आहे.
अनेकदा तक्रारी करूनदेखील महावितरण कंपनी फाट्यावर मारण्याचा काम करीत आहेत. असलेल्या दुर्घटनेबाबत शासन, प्रशासन किंवा स्थानिक पोलीस ठाणे यांस माहिती देऊनही याची दखल का घेतली जात नाही. दरम्यान, महावितरण कंपनी अपघात होण्याची वाट पाहत होते का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.