Palghar Nargrik

Breaking news

मेरी शान तिरंगा! पालघर पदसंचालन रॅली काढून ‘हर घर तिरंगा’ पालघर पोलिसांनी; यांनी नोंदवला सक्रिय सहभाग…….

पालघर:- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांनी घर, कार्यालय येथे १३ ते १५ ऑगस्टदरम्यान राष्ट्रध्वज फडकवायचा आहे. स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच ७५ वर्षांच्या गौरवशाली परंपरेला मांडत प्रत्येकाच्या मनात देशाभिमान जागृत करणे हा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या अभियानांतर्गत त्यासाठी ‘हर घर तिरंगा’ उपक्रम देशभर राबविण्यात येत आहे. या वर्षी स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना राष्ट्र उभारणीसाठी प्रत्येक नागरिकाच्या समर्पणाचे आणि राष्ट्रध्वजाशी संबंधित वैयक्तिक संलग्नतेचे प्रतीक म्हणून हे अभियान कार्य करणार आहे. हर घर तिरंगा अभियानांतर्गत स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभुमीवर देशभरातील २० कोटींहून अधिक घरांवर तिरंगा ध्वज फडकवला जाणार आहे.


त्या अनुषंगाने बाळासाहेब पाटील,पोलीस अधीक्षक पालघर, यांचे निर्देशान्वये पालघर पोलीस दलातर्फे दि.०८-०८२०२२ रोजी सायंकाळी ४ वाजता चार रस्ता ते हुतात्मा चौक(पाचबत्ती) पालघर असे “हर घर तिरंगा” रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते.
सदर पदसंचालनात जिल्हाधिकारी अरविंद बोडके, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी नीता पाडवी, पोलीस उपदेशक (गृह) शैलेश काळे,यांच्यासह पालघर पोलीस दलातील पोलीस अधिकारी व पोलिस अंमलदार तसेच सेंट जॉन महाविद्यालय, सोनोपंत दांडेकर महाविद्यालय,आनंद आश्रम विद्यालय व ट्विंकल स्टार विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

पदसंचलनात पोलीस अधिकारी अंमलदार, शालेय विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते व नागरिक असे एकूण ८०० लोकांची तिरंगा ध्वजासह सक्रिय सहभाग घेतला सदर पदसंचालन हे चाररस्ता ते हुतात्मा चौक (पाचबत्ती) दरम्यान करण्यात आले असून हुतात्मा चौक येथे पोलीस बँड पथकासह राष्ट्रगीताने पदसंचालनाची सांगता करण्यात आली.

Leave a Comment