Palghar Nargrik

Breaking news

पालघर पोलीस ठाण्याचा गुटखा माफियांवर दणका १० लाख ६७ हजार १६० किमतीचा गुटखा हस्तगत………..

पालघर:- महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी असताना बेकायदेशीरपणे गुटख्याची वाहतूक सुरु असल्याचं उघडकीस आलं आहे. गुजरात मधून येणारी गुटख्याची बेकायदेशीर इनोव्हा गाडी तुन वाहतुक करताना पालघर पोलिसांनाी पकडले आहे. पालघर पोलिस ठाण्यातील पोलिस निरिक्षक उमेश पाटील हे पेट्रोलिंग करत असताना खबर मिळाली की वाहन क्रमांक जि.जे ०१/ एच.एस/९७९७ मधून मनोर कडून पालघर कडे विमल व तंबाखू, घेऊन येणार आहेत.त्यांनी तात्काळ नाकाबंदी लावून सदर वाहन ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली असता त्यामध्यें विमल गुटखाचे १० गोणी व विमल पान मसाल्याच्या २गोणी,V-1 Tobacco king pack १० गोणी,V-1 Tobacco २ गोणी, रुपये ०५,६७,१६० किंमतीचा गुटखा आणि ५,००,००० रुपयांची इनोव्हा गाडी पकडण्यात पकडण्यात यश आले.
पालघर जिल्ह्यात अनेक अवैद्य धंद्यावर आळे घालण्यासाठी पोलीस प्रशासन रातोरात धडपड करत आहेत. कोणत्याही प्रकारचे संकट असो पोलीसांना सुरक्षेसाठी पुढे राहावे लागते. असच एक उत्तम उदा.एका पोलिसांने आपल्या जिवाची पर्वा न करता तसेच सदर आरोपीने पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला असता. मागे हडले नाही अश्या पोलिसाला सलाम.
नंडोरे नाका येथे जाऊन नाकाबंदी करीत असताना ९ च्या दरम्यान पालघर पोलिसांनी ही कारवाई केली. पालघर पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांना गुटख्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पो.ना. आर.डि.पालवे, पो.ना. कांबळे,पो.क./एस.एस शिंदे आणि पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या पथकाने मनोर येथून निघाली सफेद पालघर कडे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनावर नजर ठेवली.कार चालक धर्मेंद्र रामअवतार मोर्या, वय 40 वर्ष रा.माळी गॅरेज जवळ डुंगीपाडा,पालघर पूर्व ता.जि.पालघर,याला ताब्यात घेतले असून प्रशासनाची दिशाभूल करून फसवणूक करत वाहतूक केल्याने फसवणुकीसह इतर कलमानव्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.याप्रकरणी मनीष आणि गांधीनगर येथे राहणारा दिलावर या दोन व्यापारणाचा मुद्देमाल असून समोरच्या व्यक्तीकडून गाडी घेण्यात आली.तसेच या दोन व्यक्तींचा तपशील करून या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात यावा.
ठळक मुदे
*पालघर मध्ये पकडला लाखोचा गुटखा
*नंडोरे नाका शिवारात पालघर पोलीसांची कारवाई
*चालकासह चारचाकी वाहन व लाखोचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात
*डुंगीपाडा येथील एक जण ताब्यात;गुजरात राज्यातून गुटख्याची वाहतूक

Leave a Comment