पालघर:- पालिकेने नागरिकांसाठी दुचाकी, चारचाकी, तसेच रिक्षा वाहनांच्या पार्किंगची सोय करून द्यावी अशी मागणी होत होती.त्याकडे अजून पालिकेने पाठपुरवठा केला नाही. वाहतूक पोलीस दुचाकी वाहनावर कारवाई करतात व रीक्षा (ऑटो) वाहनांकडे दुर्लक्ष करतात असे आरोप होत होता.
पालघर रेल्वे स्टेशन वाहतूक कोंडीबाबत दिलेल्या तक्रारी अर्ज बाबत सागर वाईन समोर ऑटो रिक्षा बॅरिकेटस लावून एक मार्गी तात्पुरत्या स्वरूपात रिक्षा लाईन सुरू करण्यात आली आहे. तसेच बेकायदेशीर रित्या वाहतूकीस कोंडी करणाऱ्या वाहणांवरती भा.द.वि.स. कलम २८३ प्रमाणे रिक्षा व इतर वाहनांवर १० गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तसेच इतर वाहनांवर मोटार वाहन कायद्याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आलेले आहेत.या उत्तम कारवाई करता पालघर वाहतूक पोलिसांचे पालघर नागरिकचे संपादक जावेद लुलानिया कडून वाहतूक पोलिसांचे आभार मानत आहेत.