Palghar Nargrik

Breaking news

मनोर पोलीस स्टेशनचे डॅशिंग पोलीस निरीक्षक कसबे यांची धडक कारवाई….

अवैधरित्या विदेशी दारूची टेम्पो मधून वाहतूक करणाऱ्या दोघांना मनोर पोलिसांनी अटक केली. रविवारी रात्री आठ वाजता शिलशेत गावाच्या हद्दीतील नालशेत रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून ३३.६४ लाखाच्या दारू सहित ३८ लाखाच्या गाड्या मिळून ७२.६५ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.याप्रकरणी मनोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याकारवाईत चार वाहने आणि ६ हजार ५६६ बल्क लिटर दारू जप्त करण्यात आला आहे.याप्रकरणी दारूबंदी अधिनियमानुसार १९४९ चे कलम ६५अ व ई अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मनोर पोलिस निरीक्षकांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक कसबे यांनी शीलशेत गावाच्या हद्दीत टेम्पोतून आणलेला विदेशी दारू तीन छोट्या गाड्यांमध्ये वितरित करण्यात येत होता. रविवारी रात्री शिळशेत गावच्या हद्दीतील नाशिक रस्त्यावर छापणार असला होता. त्यावेळी नाळशेत गावच्या दिशेने एक संशयित पिकप टेम्पो जात असताना. पोलीस पाठलाग करीत असल्याचे लक्षात येताच टेम्पो चालकाने शिलशेत गावच्या हद्दीतील नाळशेत रस्त्यावर कच्च्या रस्त्यावर आडोशाला टेम्पो सोडून पळ काढला.माहितीच्या आधारे मनोर पोलिसांनी घातलेल्या धाडीत टेम्पो क्र.MH.04KU3724, बोलेरो पिकप क्र MH.48CD3840, महिंद्रा पिकप क्र.MH.48BM6447, इको स्पोर्ट MH.48s4300, या गाड्या सह ३४.६४ लाख किमतीचे रॉयल ब्लू माल्ट व्हिस्की चे ७६०बॉक्स जप्त करण्यात आलेले आहेत.

Leave a Comment