आदिवासी भागात वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारे डाॅ. प्रेमचंद गौंड पालघर जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात डाॅक्टर या नात्याने वैद्यक धर्माची त्यांनी मानवतावादी सेवा केली. नंतरच्या काळात पालघर पूर्व भागात खाजगी प्रॅक्टिस केला. पालघर शहराचा गोडवा असा की शासकीय वैद्यक सेवेनंतर अनेक खाजगी डाॅक्टरांनी पालघर भागात खाजगी दवाखाने थाटले आहेत. डाॅ. प्रेमचंद गौंड यांनी काॅंग्रेसच्या माध्यमातून राजकिय क्षेत्रात प्रवेश केला. पालघर नगरपरिषदेत नगरसेवक म्हणून निवडून आले या नात्याने चांगले काम केले.
समाजकारणाचा वसा घेतलेल्या डाॅ. प्रेमचंद गौंड यांचे राजकीय सत्तेत मन रमले नाही. पालघर विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपची उमेदवारी केली होती. त्यात त्यांना यश मिळाले नाही. हा भाग अलहिदा. पण स्वभावात गोडवा, माणुसकी, दिलदार, गोरगरीबांना मदत करण्याची दानत, अतिथींचे आदरातिथ्य मनापासून करणारे आमचे प्रेमळ स्वभावाचे मित्र डाॅ. प्रेमचंद यांना उत्तम आरोग्य लाभो. तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त पालघर नागरिकने सरकारी हॉस्पिटल येथे गरजू लोकांना फळ वाटप करण्यात आले. डॉक्टरांचा आशीर्वाद असाच सदैव आमच्यावर राहावा असे मी देवाचरणी प्रार्थना करतो व त्यांना शंभर वर्ष दीर्घ आयुष्य लाभो अशी प्रार्थना करतो.