भाग-१
जव्हार:-राज्यात अद्यापही खासगी सावकरांचा जाच हा सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. सावकरी जाचाला कंटाळून एका तरुणाने टोकाचं पाऊल उचलुन जीवन यात्रा संपविली. ही घटना जव्हार येथे घडली आहे. या प्रकरणी जव्हार पोलीस ठाण्यात सावकारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नाही. वसीम फारुख मेमन (वय-२७ )असं आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्यांचे नाव होतं. त्याने जव्हार शहरातील गांधी चौकात एका खाजगी गाळ्यात एस एम डी गारमेंट” हे कापड व्यवसाय केला होता. माञ मागील दोन वर्षात कोरोना काळात व्यावसायाची दैना झाली होती.त्यातच कापड व्यापाऱ्यांच्या,दुकानांची वाढती स्पर्धा याला सामना करावा लागत असल्याने व्यापारी हैराण आहेत. सावकारी कर्जाला शासनाची मान्यता नसतानाही काही सावकारांचा धंदा आजही ग्रामीण भागात फोफावला आहे.अशा काही सावकारांकडून गरजवंताला भरमसाट वाढीव व्याजदराने कर्ज पुरवठा केला जात आहे.सावकारांकडुन कर्जदाराला २० ते २५ टक्के चक्रव्याजाने कर्ज दिले जाते. मात्र यातुन कर्जदार कर्जाच्या ओझ्याखाली आणखी दडपला जातो. व्यवसाय पूर्ववत सुरू झाला की कर्जाची परत फेड करू अस वसीम यांनी सांगितलं होतं. परंतु कर्जाच्या व्याजासाठी सावकाराकडून तगादा लावण्यात आला. सावकाराकडून अपमानस्पद वागणूक देण्यात होती, त्यातच दुकानाची आवक बंद असल्याने कुटुंबाचा गाडा हाकणे ही कठीण झाले होते. त्यामुळे हताश झालेल्या वसीम यांनी अखेर राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
२५/०७/२०२२ रोजी ही घटना घडली आहे. जवळपास एक महिना होत असून सावकारावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही. व पोलीस प्रशासन हातात हात टाकून बसले आहेत. असं चित्र दिसत आहे. आप्पासाहेब लेंगरे यांनी आपला मनमानी कारभार करत आहेत. त्यांना फक्त अवैध धंद्यांना कशाप्रकारे अभय ठेवायचा आहे तेवढं ते काम करताना दिसत आहेत.जव्हार या ठिकाणी खाकी वर्दी वरचा विश्वास तुटला आहे. तसेच व्याजावर पैसे देणारे सावकारांचे नावे लवकरच उघडीत होतील.
वसीमची आई
माझ्या मुलाच्या आत्महत्येची चौकशी मा. एस पी साहेब यांनी स्वतः करावी कारण माझा जव्हार पोलिसांवर विश्वास नाही. एक महिना होऊन सुद्धा कोणावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही..
या रकमेच्या भरमसाट व्याजाचे पैसे भरून तो कंगाल झाला होता. त्यामुळे त्याचे मानसिक खच्चीकरण होऊन त्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याचा आरोप त्याचे कुटुंबीय आणि मित्रांनी केला आहे. बँक, पतपेढी, सहकारी बँकांतून मिळणारे कर्ज हे वार्षिक ८ टक्के ते १४ टक्के आहे. मात्र त्यासाठी कागदपत्रे उपलब्ध करणे अवघड होत असल्याने अनेक जण सावकारी मार्ग स्वीकारतात. हे सावकार मग पिळवणूक करीत राहतात, असे जाणकार सांगतात. त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली असून त्यात असे लिहिले आहे मी सर्वांचे पैसे दिले आहे. कोणालाही पैसे देण्याची गरज नाही.आत्महत्येचा अधिक तपास जव्हार पोलिस स्टेशनच्या पी.एस.आय सुर्यवंशी मँडम करीत आहेत.ह्या व्याज माफियांवर पोलिसांकडून काय कारवाई होणार? याकडे सर्व व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे. वसीम मेमन यांच्या पश्चात त्यांची पत्नी,तीन वर्षाचा मुलगा,आई-वडिल असा परिवार आहे.